९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात डॉ. बतुलबी पठाण यांच्या ‘माझा प्रवास.. एक आनंद उत्सव ‘या पुस्तकाचे प्रकाशन

९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात
डॉ. बतुलबी पठाण यांच्या ‘माझा प्रवास.. एक आनंद उत्सव ‘या पुस्तकाचे प्रकाशन
सिंहवाणी ब्युरो / सातारा
सातारा येथे आयोजित ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये डॉ. श्रीमती बतुलबी पठाण यांचे ‘माझा प्रवास.. एक आनंद उत्सव ‘या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले.
या प्रकाशन समारंभच्या वेळी मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष श्री विनोद कुलकर्णी आणि कार्यवाह सुनीताराजे पवार, वि.दा. पिंगळे उपस्थित होते. तसेच पुस्तकाच्या प्रकाशिका (प्रणाली प्रकाशन ) शामला पंडित ( दीक्षित ) राधाबाई वाघमारे,शारदा पानगे , हभप गोरे महाराज , नारायण कुंभार ,डॉ. तरुजा भोसले, शीला टाकळे, चंद्रिका निकम आणि दत्ता दरेकर इत्यादी मित्र परिवार उपस्थित होते.
प्रवास वर्णनावर आधारित असलेल्या या पुस्तकात लेखिकेने पाहिलेल्या विविध देशातील,
उदा.जपान, नेपाळ, श्रीलंका, भूतान, दुबई तेथील प्रेक्षणीय स्थळे व संस्कृती विषयक विचार मांडले आहेत. तसेच भारतातील नैसर्गिक विविधता, सांस्कृतिक विविधता इ. चे वर्णन केले आहे. पुस्तकामध्ये देश व राज्यांच्या वर्णनानुसार रंगीत फोटोमुळे पुस्तकाचे अंतरंग आकर्षक झाले आहे. प्रणाली प्रकाशनचे हे सचित्र रंगित पुस्तक सर्वांच्या पसंतिस पडेल .