भुदरगड पंचायत समिती कार्यालय समोर भारतीय किसान सभेचे बेमुदत ठिय्या व आत्मक्लेश आंदोलन

भुदरगड पंचायत समिती समोर भारतीय किसान सभेचे बेमुदत ठिय्या व आत्मक्लेश आंदोलन
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी भुदरगड पंचायत समिती कार्यालयाच्या समोर अखिल भारतीय किसान सभेचे वतीने आरळगुंडी ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभार विरोधात बेमुदत व आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात करण्यात आले
आरळगुंडी ग्रामपंचायत कारभाराची बिनचूक व सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, तीमाजी नगर मधील बेकायदेशीररित्या घरापाठील जागा व जमीन खोदून रस्ता करणाऱ्या ,लोकांच्या झाडे तोडून तसेच इतर नुकसान करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन कारवाई करण्यात आली पाहिजे,नैसर्गिक व न्यायिक तत्वाला धरून कायदेशीर कारवाई न करता अभियान कर्मचारी नीलेश डवरी यांनी केलेल्या या व्हिडिओ शूटिंगची कोणतीच सत्यता न तपासता बेकायदेशीर पत्रव्यवहार करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. अखिल भारतीय किसान सभेचे समन्वयक कॉमरेड संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाची सुरुवात करण्यात आले.
आंदोलन स्थळी विस्तार अधिकारी जी जी कांबळे, एस एस येरुडकर यांच्यासह उमेद अभियानचे कर्मचारी अधिकारी आंदोलन मागे घेण्याची विनंती करत होते मात्र कॉमरेड संग्राम सावंत यांनी आपण कोणत्याही बैठकीला येणार नाही , हा आंदोलनाचा पहिला दिवस असून जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तो पर्यंत हे आंदोलनाची धार वाढत जाउन ते चालूच राहील असे सावंत यांनी अधिकाऱ्यांना ठोसपणे सांगितले.
या आंदोलनाला सी आर पी सारिका देवेकर,धनाजी शेटके , सुनील जाधव,मारुती पाटील,राजाराम पाटील,अश्विनी कांबळे, शांताबाई पाटील, बयाबाई पाटील,,मीना पाटील,युराज पाटील, कृष्णा शेटके,रंजना पाटील,विनोद देवेकर,दत्तात्रय पाटील,पारुबाई पाटील गीता पाटील,रंजना पाटील,आशाताई पाटील,अमोल जाधव सुधाकर शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भारतीय, कॉमरेड राजेंद्र यादव, वंचित चे कोषाध्यक्ष सात्ताप्पा भारती,भुदरगड तालुका काँगेस चे तालुका कार्याध्यक्ष गजानन चव्हाण ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आदींनी या आंदोलन ठिकाणी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला.