अक्कलकोट: २२ वर्षीय तरुणीची प्रेमप्रकरणातून गळा चिरून हत्या; प्रियकराने ही केला आत्महत्येचा प्रयत्न – प्रकृती नाजूक

अक्कलकोट: २२ वर्षीय तरुणीची प्रेमप्रकरणातून गळा चिरून हत्या;
प्रियकराने ही केला आत्महत्येचा प्रयत्न
प्रकृती नाजूक
सिंहवाणी ब्युरो / महेश गायकवाड, अक्कलकोट:
अक्कलकोटमध्ये २२ वर्षीय स्नेहा श्रीकांत बनसोडे या तरुणीची तिचा प्रियकर आदित्य रमेश चव्हाण याने प्रेमप्रकरणातून गळा चिरून हत्या केली आहे. ही घटना आज रविवार दिनांक ४ जानेवारी २६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या जवळपास येथील लोखंडे मंगल कार्यालयाच्या जवळ असलेल्या कोळी यांच्या बंगल्यात घडली आहे. प्रियकर आदित्य रमेश चव्हाण वय २४, वर्षे रा. नागूर तांडा मैंदर्गी अक्कलकोट याने ही स्वतःवर ब्लेड ने वार करून नसा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याची प्रकृती अत्यंत नाजूक अशी आहे. सद्या त्यास सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या खून प्रकरणी मुलीची आई लक्ष्मी श्रीकांत बनसोडे वय ४०. रा. १८६/६८ पोगुल मळा रामवाडी सोलापूर यांनी उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रियकर मुलाविरुद्ध गुन्हा रजिस्ट र नंबर भाग ५ गुन्हा नंबर ५/२६ अन्वये खून आणि इतर कलमा खाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास डी वाय एस पी विलास यामावार हे करीत आहेत.
प्रेमप्रकरणातून हा खुनाचा प्रकार घडला आहे. आरोपीने मुलीस गेल्या वर्षभरापासून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला वारंवार अक्कलकोट येथील कोळी यांच्या बंगल्यात असलेल्या लॉज मध्ये घेऊन येत असल्याची माहिती उघड झाली आहे.
अक्कलकोट शहरात आज दुपारी खुनाची धक्कादायक घटना घडल्या नंतर अक्कलकोट मध्ये मोठी खळबळ उडाली होती. सोलापूर येथील २२ वर्षीय तरुणी स्नेहा श्रीकांत बनसोडे हिची हत्या झाल्याचे उघडकीस झाले आहे. स्नेहा श्रीकांत बनसोडे (वय २२, रा. रामवाडी, सोलापूर) असे मृत तरुणीचे नाव आहे.
स्नेहल ही सध्या शिक्षणासाठी आपल्या आजोळी, मामाकडे मैंदर्गी येथे वास्तव्यास होती. आरोपी आदित्य चव्हाण या युवकासोबत ती अक्कलकोट येथील कोळी यांच्या बंगल्यात लॉजमध्ये थांबली होती. आज दुपारी दोघांमध्ये झालेल्या वादानंतर आरोपी युवकाने लॉजच्या खोलीत स्नेहाचा ब्लेड ने गळा चिरून खून आणि स्नेहा रक्ताच्या थारोळ्यात पडल्या नंतर त्याने स्वतः वर ही ब्लेड ने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
घटनेनंतर आरोपी युवक — आदित्य चव्हाण (रा. नागुर तांडा, ता. अक्कलकोट) — याने स्वतःवर धारदार शस्त्राने गंभीर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्या नंतर जखमी अवस्थेत त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या सह उप विभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार व इतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून कोळी यांच्या लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. या प्रकरणी डी वाय एस पी विलास यामावार हे पुढील तपास करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तरुणीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.