इथेनॉलचा वापर वाढला तर ऊस उत्पादकांना चांगली किंमत मिळू शकते . -किसान ब्रिगेडचे प्रकाश पोहरे

इथेनॉलचा वापर वाढला तर ऊस उत्पादकांना चांगली किंमत मिळू शकते .
–किसान ब्रिगेडचे प्रकाश पोहरे
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज
धान्य किंवा उसापासून बनवलेल्या इथेनॉलचा वापर वाढला तर निश्चितपणे कोल्हापूर सांगली साताऱ्यातील ऊस उत्पादकांना चांगली किंमत मिळू शकते त्याकरता ब्राझील मेक्सिको ,मॉरीसिस सारख्या देशाप्रमाणे कोणत्याही इंधनावर चालणारी फ्लेक्स इंजिन वाहनांना बसवण्याची सरकारने योजना आखावी ग्रामीण भागामध्ये रात्रंदिवस वीज पुरवठा ,चांगले रस्ते, सिंचन, शिक्षण, आरोग्य यासारख्या मुलभूत सुविधा पुरवण्याची नितांत गरज आहे असे मत दैनिक देशोन्नतीचे संपादक आणि किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश भाऊ पोहरे यांनी व्यक्त केले ते श्रीपतराव शिंदे कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्री सुभाष धुमे होते प्रास्ताविक डॉक्टर संतोष कुरबेटी यांनी केले आभार प्राध्यापक अंगद धनवडे यांनी मांनले तर डॉक्टर दिनकर घेवडे, डॉक्टर सुभाष देसाई यांनीही आपले विचार मांडले
अध्यक्षीय भाषणात सुभाष धुमे म्हणाले किडनी विकून कर्ज भागवण्याची नामुष्की भारतीय शेतकऱ्यावर येते त्यांच्या अनेक आत्महत्या होतात हे भयाव आहे मात्र तरुण पिढी यामध्ये निश्चित परिवर्तन करेल
डॉक्टर सुभाष देसाई यांनी शेतकऱ्यांच्यासाठी सरकारने क्लस्टर योजना आणली आहे मात्र त्याचा लाभ मूठभर भांडवलदारांना होणार आणि शेतकरी गुलामाप्रमाणे राबणार असा धोकाही निर्माण झाला आहे असे सांगितले.
श्री प्रकाश भाऊ पोहरे पुढे म्हणाले “शेतकऱ्याच्या आत्म सन्मानाला ठेच पोचल्यामुळे व गावात बेईज्जत झाली म्हणून तो आत्महत्या करतो. वऱ्हाडातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी काय करता येईल याची जाण असणाऱ्या देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या शरद पवार यांचा शेतकरी संवाद आठ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलेला होता अशी माहिती पोहोरे साहेबांनी दिली.
आपल्या व्याख्यानाचा शेवट लाल बहादूर शास्त्री यांच्या खालील उद्गारांनी केला “जब तक हम अपने किसानों के लिए अधिकारों का समर्थन नही करेंगे तब तक विकास संभव नाही.”