भुदरगड भूमि अभिलेख विभागाची विशेष मोहिम : ११० प्रकरणांची मोजणी कार्यवाही : एक दिवसात १०० प्रकरणे निकाली.

भुदरगड भूमि अभिलेख विभागाची विशेष मोहिम :
११० प्रकरणांची मोजणी कार्यवाही : एक दिवसात १०० प्रकरणे निकाली.
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
पावसाळयानंतर जमीन मोजणीच्या कामासाठी कोल्हापूर जिल्हयातील अर्जदारांची प्रलंबीत मोजणी प्रकरणे निकाली काढण्यासाठी गठीत पथकाकडून मोजणीची कामे पूर्ण करण्याची मोहीम भुदरगड भूमि अभिलेख कार्यालयाकडून राबवून ११० मोजणी प्रकरणांची मोजणीची कार्यवाही पूर्ण करुन त्यापैकी १०० प्रकरणे निकाली काढण्यात आली, अशी माहिती विनायक कुलकर्णी, उपअधीक्षक भूमि अभिलेख भुदरगड यांनी सिंहवाणीशी बोलताना दिली
भूमि अभिलेख विभागाकडे शेत जमिन मोजणीसाठी अर्ज दाखल केले जातात अर्जदार यांचे पसंतीनुसार दोन प्रकाचे शुल्क अर्जदारांकडून भरणा करुन घेतले जाते त्या अर्जदारानां ऑनलाईन प्रक्रीयेतून मोजणीची तारीख दिली जाते साधारणता ऑक्टोबरनंतर पाऊस थांबतो या महिन्यापासून मोजणी प्रक्रीयेला सुरुवात केली जाते मात्र यंदा पावसाळयानंतरही गेल्या अनेक दिवसांपासून परतीचा पाऊस सुरु होता. आधी अर्ज केलेल्यांना दिलेल्या तारखेच्या दिवशी पावसामुळे मोजणी करता आली नाही त्यामुळे भूमि अभिलेख विभागाकडे मोजणीसाठी प्रलंबीत प्रकरणांची संख्या वाढली. ती निकाली काढण्यासाठी विभागाने आता विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. या मोहिमेअंतर्गत भुदरगड तालुक्यातील ११० मोजणी प्रकरणांची मोजणी कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे त्यापैकी १०० प्रकरणे निकाली काढयात आली आहेत. श्री. शिवाजी भोसले जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्यायातील भुदरगड तालुक्याचे उपअधीक्षक कुलकर्णी यांच्यासह कोल्हापूर जिल्हयातील मोजणी कर्मचारी कार्यरत होते. विशेष म्हणजे दिनांक ३/१/२०२६ रोजी शासकीय सुटटी दिवशी या सगळया मोहीमेत भूमि अभिलेख विभागातील उपअधीक्षकांसोबतच कार्यालयातील व जिल्हयातील कनिष्ठ लिपीक, शिरस्तेदार व अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.
