*बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी, पाल. येथे कार्यशाळा संपन्न* . बारावी सायन्स विद्यार्थ्यांसाठी “फार्मसी – एक उत्तम करिअर” व “CET परिक्षा मार्गदर्शन”

*बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी, पाल. येथे कार्यशाळा संपन्न*
बारावी सायन्स विद्यार्थ्यांसाठी “फार्मसी – एक उत्तम करिअर” व “CET परिक्षा मार्गदर्शन”
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी, पाल. येथेकाॅलेज ऑफ फार्मसी, पाल. येथे बारावी सायन्स विद्यार्थ्यांसाठी *”फार्मसी – एक उत्तम करिअर”* व *”CET परिक्षा मार्गदर्शन”* कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमासाठी स्वप्नपुर्ती ग्रुप ऑफ कंपनीज चे चेअरमन डॉ. मोहन गोखले तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ. अमर पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमास के.एच. कॉलेज, गारगोटी. , विद्यावर्धिनी कॉलेज पाल. चे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी, पाल.चे डी. फार्मसी व बी. फार्मसी चे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी विविध उपक्रम सादर केले. तसेच या कार्यशाळेसाठी व्हि.व्हि.आय.टी.चे प्राचार्य धनाजी रेपे, प्रा.वैष्णव देसाई यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेसाठी 100 पेक्षा अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजरत्न कांबळे व प्रास्ताविक प्रा. पुजा बोडके यांनी केले. यावेळी कॉलेजचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.