जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भुदरगड तालुक्यात अर्जात गोंधळ : त्रुटीपूर्ण नामनिर्देशन अर्जाचे वाटप निवडणूक यंत्रणेचा जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

भुदरगड तालुक्यात अर्जात गोंधळ : त्रुटीपूर्ण नामनिर्देशन अर्जाचे वाटप

निवडणूक यंत्रणेचा जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी:
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यात निवडणूक विभागाच्या निष्काळजीपणामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. त्रुटीपूर्ण नामनिर्देशन अर्जाचे वाटप केल्याने दीडशे इच्छुक उमेदवारांना फोन करून परत बोलावण्याची नामुष्की प्रशासनावर आली. निवडणूक यंत्रणेचा निष्काळजीपणा उघड झाला असून, यामध्ये इच्छुकांची फरफट झाली आहे. मात्र, ही चूक झेरॉक्स करणाऱ्यामुळे झाली, असल्याचे सांगत तहसिलदारानी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

शुक्रवार व शनिवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुकांनी तालुका निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज नेले. नामनिर्देशन पत्र १६ नमुन्यांमध्ये देणे बंधनकारक असताना निवडणूक विभागाने तेरा नमुन्यांमध्ये अर्ज उपलब्ध करून दिले. त्यातही अकरा, बारा व तेरा हे नमुने दुबार पाने असल्याने संपूर्ण बंचच चुकीचा तयार करून इच्छुकांना दिला.

सुमारे १४७ अर्जाचे वाटप झाल्यानंतर ही चूक तिरवडेच्या दिलीप गुरव यांनी निवडणूक विभागाच्या निदर्शनास आणून दिली. नंतर प्रशासनाचे डोळे

उघडले. मात्र, तोपर्यंत नुकसान झाले होते. दोन दिवसांत अर्ज घेतलेल्या इच्छुकांना फोन करून पुन्हा कार्यालयात बोलावले आणि नवीन अर्ज देण्यात आले.

दरम्यान, काहींनी आधीच प्रतिज्ञापत्रे तयार करून, नोटरी, झेरॉक्स आदी प्रक्रिया पूर्ण केलेले अर्ज आणले होते. निवडणूक विभागाच्या चुकांमुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकरणाला दुजोरा दिला. मात्र, ही चूक झेरॉक्स करणाऱ्यामुळे झाली, असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button