गडहिंग्लजला वाहनधारक सुसाट… अपघातांची मालिका! वेग मर्यादेची अंमलबजावणी करण्याची

गडहिंग्लजला वाहनधारक सुसाट…
अपघातांची मालिका!
वेग मर्यादेची अंमलबजावणी करण्याची
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज
संकेश्वर-बांदा हा राष्ट्रीय महामार्ग गडहिंग्लज
शहरातून गेला आहे. शहरातील स्त्याचे काम पूर्ण झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. या
महामार्गावर सहा महिन्यांत 25हून अधिक जणांना अपघातामुळे जीवगमवावा लागला आहे. अलीकडे बाहेरून येणारी वाहने सुसाट शहरात घुसू लागल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. परिणामी, गडहिंग्लजमध्ये
पोलिस प्रशासनाने वेग मर्यादेची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
सहा महिन्यांपासून सुरू असणारे शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी
पूर्ण झाले. अनेक अडचणींचा सामना करत हा रस्ता पूर्ण झाला. मुळातच पूर्वीपासून शहरातील
सर्वाधिक रहदारीचा संकेश्वर- आजरा मार्ग आहे. त्यातच हाच रस्ता राष्ट्रीय महामार्गात रुपातंरित झाल्याने वाहनांच्या गर्दीत वाढ झाली. या
मार्गावर वाहनांच्या संख्येबरोबरच वेगातही लक्षणीय वाढ झाल्याने
अपघातांचे प्रमाण अधिक आहे.
मुख्यत्वे शहराबाहेरून येत असताना वाहनांचा वेग अधिक आहे. शहरात
आल्यानंतरही या वेगाला आवर न घातल्यानेच अपघात वाढल्याचेजाणकारांचे मत आहे.
या राष्ट्रीय महामार्गाला दोन्ही
बाजूला शहरातील सुमारे दीडडझनाहून अधिक जोडरस्ते मिळालेआहेत. साहजिकच या जोड
रस्त्यावरून राष्ट्रीय महामार्गावर
नेहमीच वाहने आणि नागरिकांचीवर्दळ असते.मार्केट यार्डात दुकान असल्याने गावातून रोज राष्ट्रीय महामार्गओलांडून जावे लागते. भीमनगर कमानीतून या मार्गावर जातानावाहनांच्या अधिक वेगामुळे जीव धोक्यात घालूनचवावरावे लागते. त्यासाठी
राष्ट्रीय महामार्गावर गडहिंग्लज शहरात वेग मर्यादेची अंमलबजावणी व्हावी. अशी मागणी केली जात आहे.
घर महामार्गाला लागूनच आहे. घरातून बाहेर पडताना व जाताना वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे धडकी भरते. खासकरूनआजरा मार्गावरून येणारी वाहने सुसाट येतात. राष्ट्रीय महामार्गावरून ये-जाकरणे ज्येष्ठ आणि महिलांना धोकादायक ठरत आहे. पोलिसांनी वेगातील
वाहनांवर कारवाई करावी. याकडे लक्ष वेधले आहे.शहरातून महामार्ग गेला नागरिकांची मानसिकता अद्यापपूर्वीचीच आहे. यामुळे बाहेरूनअधिक वेगाने येणारी वाहनेअपघाताला आमंत्रण देणारीठरत आहेत. शहरात प्रति ताशी३० कि. मी. या वेगाने वाहने
चालवावीत असा नियम आहे.पण, याची अंमलबजावणी नसल्यानेवाहनचालक बेदरकारपणे गाड्याचालवून नागरिकांच्या जीवाशीखेळत आहेत. या पार्श्वभूमीवरवाहतूक पोलिसांनी कारवाईचाबडगा उगारावा, अशी नागरिकांचीमागणी आहे.रस्ता तितकाच, मात्र वेग वाढलाराष्ट्रीय महामार्ग शहरातून गेला
तरी रस्त्याची रुंदी वाढलेली नाही.
‘गटर टू गटर’ बांधणी झाल्याने मूळ
रस्त्याची लांबी, रुंदीत बदल झालेलानाही. पण, रस्ता चांगल्या झाल्यानेवाहनांचा वेग चौपटीने वाढलाआहे. रस्त्यालगतच बाजारपेठ,शाळा, महाविद्यालये आणिकार्यालये असल्याने नागरिकांनादैनंदिन कामाकाजासाठी राष्ट्रीयमहामार्गावर येण्याशिवाय पर्यायनाही. त्यामुळेच वाहनांच्या अधिकवेगाने रोजचछोट्या-मोठ्याअपघातांची संख्या वाढली आहे. दसरा चौकात शाळा असल्याने विद्यार्थी आणि पालक यांना जीव मुठीत घेऊन वाटचाल करावी लागते.