शिक्षकांनी अपडेट राहणे काळाची गरज: कुलगुरू डॉ. शिर्के कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेला डी.डी.आसगावकर उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्काराने सन्मानित

शिक्षकांनी अपडेट राहणे काळाची गरज:
कुलगुरू डॉ. शिर्के
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेला डी.डी.आसगावकर उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्काराने सन्मानित
सिंहवाणी ब्युरो /गडहिंग्लज :
उच्च शिक्षण प्रक्रियेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण महत्त्वाचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना अधिक कौशल्य ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी शिक्षकांनी जीवनात अपडेट राहणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांनी तंत्रस्नेही बनले पाहिजे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. डी. एन. शिर्के यांनी केले.
येथील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेला गुरुवर्य डी. डी.आसगावकर शैक्षणिक सामाजिक व क्रीडा विकास ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्था म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात डी.डी.आसगावकर ट्रस्टचे अध्यक्ष पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत सभागृह दसरा चौक, कोल्हापूर येथे संपन्न झाला. शिवराज विद्या संकुल आणि 16 गुणवंत शिक्षक यांना गौरविण्यात आले.
हा पुरस्कार कर्मवीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे व सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष श्री के. जीं. पाटील,ऍड. दिग्विजय कुराडे, प्रा. डॉ. सुनील देसाई, प्रा. आनंदराव नाळे, के. व्ही. पेडणेकर, श्री नंदनवाडे गुरुजी, श्री बसवराज आजरी, संचालिका प्रा. बिनादेवी कुराडे,प्राचार्य डॉ एस. एम. कदम, रजिष्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर यांच्यासह मान्यवर, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
पुरस्कार मान्यवर असे :
■ कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे संस्था, गडहिंग्लज तर गोविंद कोळेकर (कोल्हापूर), श्रेणिका पाटील (करवीर), मंजूषा रावळ (इचलकरंजी), संजय कुंभार (गडहिंग्लज), रमेश देसाई (कागल), जयसिंग पाटील (पन्हाळा), महादेव शिवनगेकर (चंदगड), अस्मिता पाटील (आजरा सुनील ढोकरे (राधानगरी), अलका पाटील (हातकणंगले), प्रदीप पाटील (करवीर, कोपार्डे), कृष्णा निंबाळकर (कुडित्रे), विजय गाव (शाहूवाडी), अमृत देसाई (भुदरगड).