क्राईमजिल्हाताज्या घडामोडी

दहा तोळे सोने लुटून महिलेचा खून : एकास अटक गडहिंग्लज येथील खळबळजनक घटना

दहा तोळे सोने लुटून महिलेचा खून : एकास अटक
गडहिंग्लज येथील खळबळजनक घटना



सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज

दहा तोळे सोने लुटून महिलेचा खून केले प्रकरणी गडहिंग्लज पोलिसानी एकास अटक केलीआहे. ,पिंटू चौगुले असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी, गडहिंग्लज शहरात शनिवारी सायंकाळी फिरावयास गेलेली एक महिला बेपत्ता झाली होती. रविवारी सकाळी मेटाचा मार्ग गडहिंग्लज येथे शोभा सदाशिव धनवडे (वय 62) या महिलेचा तोंडात बोळा कोंबून तिच्या अंगावरील दहा तोळे सोन्याचे दागिने लुटून घातपात झाल्याची आढळून आले होते. मात्र पोलिसानी तातडीने तपास करून त्या महिलेचा सोन्या साठी खून केला असल्याचे उघडकीस आणले. शोभा धनवडे यांनी संशयित पिंटू ऊर्फ गुरुनाथ भैरव चौगुले (वय 39 रा. हट्टी बसवाणं गडहिंग्लज ) याला रुपये 10हजार उसने दिले होते. शनिवारी त्या फिरावयास गेल्या असता त्यांना पिंटू चौगुले भेटला असता त्यानी त्याच्याकडे पैशाची विचारणा केली . तुम्हाला उसने घेतलेले पैसे देतो असे सांगून पिंटू याने त्या महिलेस दुचाकीवरून आपल्या घरी घेऊन गेला. यावेळी महिलेने पैशाचा तगादा लावताच पिंटू याने रागाच्या भरात त्या महिलेचा गळा आवळून खून केल्याचे पोलिसानी तपासात उघडकीस आणले.पहाटे ओमनिं गाडीतून जवळ असलेल्या एका विहिरीत पिंटू याने मृतदेह टाकला मात्रं तो झुडपात अडकल्याचे आढळून आले होते. पोलिसानी अप्पर पोलीस अधीक्षक नितीन खाटमोडे पाटील, पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, गुन्हे अन्वेषण पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, गडहिंग्लज पोलिस निरीक्षक अजय सिंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून आरोपीला अटक केली. गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button