गारगोटीच्या उपसरपंचपदी प्रशांत भोई यांची बिनविरोध निवड

गारगोटीच्या उपसरपंचपदी प्रशांत भोई यांची बिनविरोध निवड
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
भुदरगड तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गारगोटी ग्रामपंचायतीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची सत्ता असून त्यांच्या गटाचे प्रशांत शिवाजी भोई उपसरपंच पदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश वास्कर होते.
मावळते उपसरपंच सागर शिंदे यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सोमवारी रोजी निवड प्रक्रिया पुर्ण झाली. या निवडीवेळी के.डी.सी.सी.बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर व माजी सरपंच सर्जेराव देसाई प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आबिटकर म्हणाले की, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून गारगोटी शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून आगामी काळात देखील शहरातील विविध विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना नुतन उपसरपंच प्रशांत भोई म्हणाले की, पालकमंत्री प्रकाश आबिटकर व प्रा.अर्जुन आबिटकर यांच्यासह सर्वच नेतेमंडळींनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर उपसरपंच पदाची जबाबदारी दिलेली आहे. या मिळालेल्या संधीच नक्कीच सोनं करु.
यावेळी माजी सरपंच सर्जेराव देसाई, मावळते उपसरपंच सागर शिंदे, प्रा.मिलिंद पांगीरेकर आदींनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य भरत शेटके, विक्रम चौगले, संदीप देसाई, राहूल जाधव, सदस्या लता चव्हाण, रुपाली राऊत, संध्या कुपटे, स्मिता पिसे, मेघा भोसले, किरण कल्याणकर, पायल पावले यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.