ताज्या घडामोडी
पत्रकार अविनाश चव्हाण यांचे दुःखद निधन

पत्रकार अविनाश चव्हाण यांचे दुःखद निधन
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
येथील ज्येष्ठ पत्रकार अविनाश शंकरराव चव्हाण यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 56 वर्षांचे होते रक्षाविसर्जन मंगळवार दिनांक 4 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता पुष्पनगर तालुका भुदरगड येथे त्यांच्या राहत्या गावी आहे.
अविनाश चव्हाण उर्फ पिलूदा गेली 25 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात होते. त्यांचा जनसंपर्क मोठा होता. एखाद्या विषयावर तेच सडेतोड भूमिका घेत असत. त्यांच्या अकाली जाण्याने या क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुले असा मोठा परिवार आहे.
सिंहवाणी परिवाराच्या वतीने श्रद्धांजली
सिंहवाणी परिवाराच्या वतीने अविनाश चव्हाण यांना आज सकाळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ते सिंहवाणी परिवाराचा सदस्य होते.