भुदरगड तालुक्यातील दोन केंद्रावर काॅपीचा सुळसुळाट : परिक्षा मंडळ कडक उपाययोजना करणार का?

भुदरगड तालुक्यातील दोन केंद्रावर काॅपीचा सुळसुळाट
: परिक्षा मंडळ कडक उपाययोजना करणार का?
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
भुदरगड तालुक्यातील दहावीच्या दोन केंद्रावर काॅपीचा सुळसुळाट सुरू असल्याची चर्चा विद्यार्थ्यात सुरू आहे. शाहू कुमार भवन व मौनी बनारस परिक्षा केंद्रावरील मोजक्या खोल्यांमध्ये काॅपीची छुपी यंत्रणा काम करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
तालुक्यातील आठ केंद्रावर १ हजार ८०० विद्यार्थी दहाविची परिक्षा देत आहेत.
श्री शाहू कुमार भवन गारगोटी, वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल गारगोटी,
कुमार भवन पुष्पनगर,
दौलत विद्यामंदिर मडिलगे,
आर. व्ही. देसाई हायस्कूल मिणचे, प.बा पाटील हायस्कूल मुदाळ, कुमार भवन कडगाव
सेंट फ्रान्सिस हायस्कूल तिरवडे या केंद्रावर दहावीची परीक्षा सुरू आहे.
दहावीपरिक्षेचे निम्म्यापेक्षा अधिक पेपर झाले आहेत. शाहू कुमार भवन प्रशालेतील ९ व १० क्रमांकाच्या दोन खोल्यामध्ये तसेच मौनी बनारस मधील एका खोलीमध्ये काॅपीची छुपी यंत्रणा कार्यान्वित असल्याची चर्चा सुर आहे. तब्बल चार पेपरना पैकीच्या पैकी मार्क मिळणार असल्याचे या खोल्यातील परिक्षार्थी सांगत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काॅपीमुक्त परिक्षा घेण्यासाठी आवाहन केले असताना देखील काही केंद्रावर असे प्रकार घडत असतील तर अभ्यासू विद्यार्थ्यांनी काय करायचे असा प्रश्न विचारला जात असुन नाराजी व्यक्त केली जात आहे.
या केंद्रावरुल काॅपी रोखण्यासाठी जिल्हातील बैठे स्काॅड ठेवावे तसेच केंद्राच्या सभोवताली कॅमेरे चित्रीकरणासाठी ठेवावेत अशी मागणी पालक व विद्यार्थी वर्गातून होत आहे