खेडगे गावठी बाॅंबच्या साह्याने रान डुक्कराची हत्या प्रकरण : भुदरगड तालुक्यातील प्राध्यापकावर गुन्हा दाखल : प्राध्यापक फरार

खेडगे गावठी बाॅंबच्या साह्याने रान डुक्कराची हत्या प्रकरण
: भुदरगड तालुक्यातील प्राध्यापकावर गुन्हा दाखल : प्राध्यापक फरार
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
भुदरगड तालुक्यातील खेडगे येथे गावठी बाॅंबच्या साह्याने रान डुक्कराची हत्या केल्या प्रकरणी
सरपंचासह सात जणांना अटक करण्यात आली होती. तपासात प्रा. हिंदूराव रामचंद्र पाटील याचे नाव निष्पन्न झाले असुन या वन्य प्राण्यांची शिकार प्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती गारगोटी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक यांनी दिली.
खेडगे येथील दुरगाडी शेतात सोमवारी सायंकाळी ८ वा. दरम्यान गावठी बाॅंबच्या साह्याने रानटी डुक्कराची हत्या करण्यात आली. याची माहिती गारगोटी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक यांना मिळताच वनपाल बळवंत शिंदे, एम. बी. काशीद, वनरक्षक वनिता कोळी, आशिष चाळसकर, वर्षा तोरसे, संजय गौड यांनी पाळत ठेवून घरामध्ये झडती घेऊन मासासह रंगेहाथ पकडले. याप्रकरणी
प्रकाश हैबती देसाई (वय-५९), शंकर धनाजी घोरपडे (वय-५०), जनार्दन शिवराम देसाई (वय-५८), सुभाष तुकाराम देसाई (वय-४६), संतोष बबन देसाई (वय-४७), सुभाष बाबासो देसाई (वय-४४), अंतोबा यशवंत कांबळे (वय-७८) यांना अटक करण्यात आले होते. पुढील तपासात बिद्री महिविद्यालयाचे प्रा. हिंदुराव रामचंद्र पाटील (रा. कोनवडे, ता. भुदरगड) याचे नाव निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी हिंदुराव पाटीलवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रा. हिंदुराव पाटील अटकेच्या भितीने फरार झाला आहे. मुलगा अजिंक्य यास समज देऊन सोडून देण्यात आले. प्रा. पाटील याची स्विफ्ट गाडी वनविभागाने ताब्यात घेतली आहे.