जिल्हाताज्या घडामोडी

कडगाव येथील महावितरण कार्यालय म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा कार्यालयचा फोन गेली अनेक वर्षे बंद

कडगाव येथील महावितरण कार्यालय म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा

कार्यालयचा फोन गेली अनेक वर्षे बंद

सिंहवाणी ब्युरो / पाटगाव
भुदरगड तालुक्यातील कडगाव येथील महावितरण चे कार्यालय म्हणजे असून अडचण व नसून खोळंबा असे झाले आहे.
कडगाव हे गाव चाळीस खेड्यांची प्रमुख बाजारपेठ असलेले गाव असून या ठिकाणी गेली अनेक वर्षे महावितरण चे कार्यालय आहे.या कार्यलयाला जाण्यासाठी सरळ रस्ता नाही.कार्यालयचा फोन गेली अनेक वर्षे बंद आहे. वारंवार लँडलाईन फोन चालू करा अन्यथा कार्यलय मधील उपस्थित असणाऱ्या ऑपरेटर यांचा मोबाईल नंबर सर्वाना द्यावा अशी मागणी ग्राहकांतून नेहमी केली जाते परंतुअधिकार्यांमध्ये या बाबत गांभीर्य दिसत नाही. सध्या वळिव पावसाचे वातावरण असून या परिसरात दरवर्षी वादळी वाऱ्यासह वळिव पाऊस मोठ्या प्रमाणात होत असतो तसेच पावसाळ्यात देखील विक्रमी पावसाची नोंद होते अशा वेळी झाडे उन्मळून पडत असतात अशी दुर्घटना घडल्यानंतर विजपूरवठा सुरु असणाऱ्या तारा रस्त्यावर पडल्या असतील तर महावितरण ला कसे कळवयाचे हा गहन प्रश्न सर्वाना सतावतो.
या कार्यलयात अधिकाऱ्यांनी देखील दररोज हजर राहून शेती पंप, स्ट्रीट लाईट, घरगुती कनेक्शन, इंडस्ट्रीज वीज जोडणी आदी प्रलंबित कामासाठी व ग्राहकांना योग्य माहिती मिळण्यासाठी हजर असावे तसेच हा परिसर वन हद्दी लगत असल्याने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी पाजणे धोक्याचे आहे. आज पर्यंत पाच ते सहा शेतकऱ्यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे या गंभीर प्रश्नाकडे महावितरण गांभीर्याने घेत नसल्याने शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष आहे. वन हद्दी लगतच्या गावांना दिवसा वीज पुरवठा द्यावा अशी मागणी गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांमधून होत आहे पण या मागणी कडे महावितरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.
कडगाव येथील महावितरण कार्यालयाचा रस्ता, मोबाईल नंबर किंवा लँडलाईन फोन चालू करावा व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे महावितरण वरिष्ठ अधिकाऱ्यानी लक्ष घालून या कार्यलयातील उनिवा दूर करून या कार्यलयाला गतवैभव प्राप्त करून द्यावे अशी मागणी विभागतील ग्राहकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button