शेतकऱ्यांना उसाचे बिल एक रकमे देण्यात यावे मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल: जी आर रद्द: साखर वाटून आनंद उत्सव साजरा

शेतकऱ्यांना उसाचे बिल एक रकमे देण्यात यावे
मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल: जी आर रद्द:
साखर वाटून आनंद उत्सव साजरा
सिंहवाणी ब्युरो / कडगाव
*स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवाजी चौकामध्ये फटाके वाजवून व साखर वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला..!*
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना उसाचे ऊस बिल एक रकमी देण्याचा कायदा केलेला असताना महाराष्ट्र सरकारने तो कायदा मोडून तीन टप्प्यांमध्ये एफ आर पी शेतकऱ्यांना देण्यात यावी असा जीआर काढला त्या जीआरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने सदर अध्यादेश रद्द व्हावा व शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी रक्कम मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करण्यात आले होते या अपीलाचा आज निकाल होऊन शेतकऱ्यांना उसाचे बिल एक रकमे देण्यात यावे, असा आदेश जारी केला व महाराष्ट्र शासनाने केलेला जीआर रद्द करण्यात आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऍडव्होकेट योगेश पांडे यांनी काम पाहिले. या शेतकऱ्याच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा अध्यक्ष अजित पोवार, जिल्हा उपाध्यक्ष कुंडलिक गुरव,भुदरगड.ता.अध्यक्ष संजय देसाई, मायकल डिसोझा, बाळासाहेब देसाई, तुकाराम गुरव,विश्वास पाटील, तुकाराम गुरव,विजय फगरे,प्रमोद सिद्रूक,भगवान सुतार.