क्राईमजिल्हाताज्या घडामोडी
गारगोटीत बनावट सोने ठेवून बँकेची पाच लाखांची फसवणूक भुदरगड पोलीसत गुन्हा दाखल

गारगोटीत बनावट सोने ठेवून बँकेची पाच लाखांची फसवणूक
भुदरगड पोलीसत गुन्हा दाखल
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
गारगोटी येथील एका बँकेत बनावट सोने ठेवून बँकेची ५ लाख ५८ हजार १९९ रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी भुदरगड पोलिसांत दिली आहे. याबाबत बँकेचा मूल्यांकनकर्ता प्रकाश धोंडीराम मालवेकर (रा. गारगोटी, ता. भुदरगड) आणि कर्जदार समीर राजेसाहेब नाईकवडे (रा. मडूर, ता. भुदरगड) या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. येथील एका बँकेत समीर राजेसाहेब नाईकवडे याने बँकेचा मूल्यांकनकर्ता प्रकाश धोंडीराम मालवेकर याला हाताशी धरून बनावट सोने बँकेत गहाण ठेवून ११ मार्च २०२४ रोजी २ लाख, १ लाख आणि २१ ऑक्टोबर २०२४ रोजी १ लाख ४५ हजार असे एकूण ५ लाख मुद्दल आणि त्याचे व्याज ३८ हजार असे एकत्रित ५ लाख ५८ हजार १९९ रुपयांची फसवणूक केली होती. ही घटना मार्च २०२५ मध्ये व्यवस्थापकाच्या निदर्शनास आली.