जिल्हाताज्या घडामोडी
भुदरगड तालुक्यातील बारवे -नागणवाडीजवळ तीन बछड्यांचे दर्शन तालुक्यात बिबट्या ची संख्या लक्षणीय

भुदरगड तालुक्यातील
बारवे -नागणवाडीजवळ तीन बछड्यांचे दर्शन
तालुक्यात बिबट्या ची संख्या लक्षणीय
सिंहवाणी ब्युरो / पिंपळगाव :
भुदरगड तालुक्यातील बारवे -नागणवाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतात बिबट्याच्या तीन बछड्यांचे शेतकऱ्यांना दर्शन झाले. तालुक्यात बिबटे दोन अंकी संख्येने असावेत असे जाणकार सांगतात. बिबट्या चा वावर भुदरगडच्या जंगलात 15 ते 20 किलोमीटर परिसरात असल्याचे अनेक जण सांगतात
एक महिन्यापूर्वी दिंडेवाडी-बारवे रस्त्याच्या बाजूला असलेल्या प्रकाश इंदुलकर यांच्या शेतात बिबट्या मादीचे दर्शन झाले होते. या बिबट्या मादीचा दिंडेवाडी येथील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. दरम्यान, गेले चार दिवस तीन बछड्यांचे येथील शेतकऱ्यांना शेतात दर्शन होत आहे. दिंडेवाडी येथील युवक अमर पाटील यांनी बछडे दिसल्याचे वन विभागास कळवले. वन विभागाने या वनहद्दीत रात्री गस्त घालावी, अशी मागणी होत आहे.
