श्री शंभु महादेवाची कावड अचलेर येथुन श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी दुसऱ्यांदा पार पडली बैठक

श्री शंभु महादेवाची कावड अचलेर येथुन
श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी दुसऱ्यांदा पार पडली बैठक
सिंहवाणी ब्युरो / सोलापूर
शंभु महादेवाची कावड अचलेर येथुन श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी मोठे नियोजन केले जात असून आज गुरूवारी सोलापूर येथे सुयश गायकवाड आणि मित्र परिवाराची दुसऱ्यांदा बैठक पार पडली. या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली आणि अंतिम निर्णय कावडीचे मुख्य मानकरी महादेव शंकर गायकवाड यांच्या वर सोडण्यात आला आहे.
आज सोलापूर येथील श्री सिध्देश्वर मंदिरात सुयश गायकवाड आणि मित्र परिवाराची ही बैठक दुसऱ्यांदा पार पडली .
याप्रसंगी बोलतांना सुयश गायकवाड म्हणाले आमच्या शंकर साधू गायकवाड घराण्यात सद्या चौथी पिढी शंभू महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी कावड घेऊन जाण्याच्या तयारी मध्ये असून आम्ही सर्व भावंडे आणि भक्तगण तसेच भाविक यांच्या सहकार्याने या वर्षी गुडी पाडव्याला कावड श्री शंभू महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी घेऊन जाण्यासंदर्भात निश्चित च तयारी सुरू करण्यात आली आहे 30 मार्च रोजी सायंकाळी कावड श्री क्षेत्र शिंगणापूर कडे प्रस्थान करण्यासाठी सज्ज असणार असून पहिला मुक्काम नळदुर्ग येथे करण्यासंदर्भात विचार विनिमय केला जात आहे. 9 एप्रिल रोजी शंभू महादेव यांच्या जत्रेतील मुख्य दिवस असून कावड 8 एप्रिल रोजी शिखर शिंगणापूर येथे पोहचण्यासाठी वेळा पत्रक ठरविले जात आहे. 9 एप्रिल रोजी पहाटे महादेवाला जलाभिषेक केल्या नंतर त्याच दिवशी कावड परती च्या प्रवासाला निघणारा आहे. असे हे सर्व नियोजन आहे आज 20 मार्च रोजी आम्ही मित्र मंडळींची सोलापूर येथे दुसऱ्यांदा बैठक पार पडली या बैठकीत कावड निश्चित श्री शंभू महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले आहे. अचलेर नगरीचे प्रतिष्ठीत नागरिक आणि ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा पंच कमिटी यांच्या बरोबर विचार विनिमय करून कावड श्री क्षेत्र शिंगणापूर येथे घेऊन जाण्यासाठी वेळ आणि दिवस निश्चित करण्यात येणार आहे. तसेच कावडीचे मुख्य मानकरी महादेव शंकर गायकवाड यांच्या वर अंतिम निर्णय सोपविण्यात आला आहे
सुयश महेश गायकवाड
शंभू महादेव कावड मानकरी
श्रीक्षेत्र अचलेर