गृहिणी जर निरोगी, तर कुटुंब निरोगी घरगाडा हाकताना स्वतःच्या आहाराची प्रकृतीची काळजी घ्यावी: डाॕ.चंद्रकांत परुळेकर

गृहिणी जर निरोगी, तर कुटुंब निरोगी
घरगाडा हाकताना स्वतःच्या आहाराची प्रकृतीची काळजी घ्यावी: डाॕ.चंद्रकांत परुळेकर
सिंहवाणी ब्युरो / पिंपळगाव :
महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.घरातील गृहिणी जर निरोगी असेल तर कुटुंब निरोगी रहाते.घरगाडा हाकताना स्वतःच्या आहाराकडे लक्षद्यावे. प्रकृतीची काळजी घ्यायलाच हवी .असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डाॕ.चंद्रकांत परुळेकर यांनी केले.मुरुक्टे ता.भुदरगड येथील कार्यक्रमात ते बोलत होते. सरपंच रंजना कांबळे अध्यक्षस्थानी होत्या. गटप्रेरिका गिता खोचारे यांनी प्रास्ताविक केले. महिला आरोग्य जागृती बद्दल यावेळी माहिती देण्यात आली. आनंदी महिला ग्रामसंघ मुरुक्टे , ग्रामपंचायत मुरुक्टे यांच्या वतीने महिला आरोग्य जागृती कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी संद्या भांडवलकर,संजिवनी ऱ्हाटवळ , सुनिता गुरव, मंगल भोसले, गिता पाटील, सुजाता सुतार, सविता गडकरी, मंगल खोचारे , लता मिटके, सुनंदा आयरे आदी उपस्थित होते. सुनिता गुरव यांनी आभार मानले.