प्राध्यापक भरतीसाठी आझाद मैदानावर 7 एप्रिल पासून बेमुदत सत्याग्रह आंदोलन- प्राध्यापक जोतिराम सोरटे,

प्राध्यापक भरतीसाठी आझाद मैदानावर 7 एप्रिल पासून बेमुदत सत्याग्रह आंदोलन-
प्राध्यापक जोतिराम सोरटे,
सिंहवाणी ब्युरो /गारगोटी –
नेट सेट संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत अधिवेशन काळात आझाद मैदानावर सत्याग्रह आंदोलन छेडले असता शिक्षण मंत्री महोदयानी सभागृहात पंधरा दिवस ते एक महिन्याच्या आत मध्ये 4435 प्राध्यापकांच्या रिक्त जागांची भरती जीआर काढतो असे सांगितले आहे. अद्यापही जीआर निघालेला नाही. चालू आठवड्यात जीआर न निघालेस 7 एप्रिल पासून पुन्हा एकदा आझाद मैदानावर बेमुदत सत्याग्रह आंदोलन -8 व एप्रिल मे मध्ये होणाऱ्या राज्यातील सर्व विद्यापीठ परीक्षेवर बहिष्कार टाकणार असल्याचे प्राध्यापक जोतिराम सोरटे, समन्वयक नेट सेट पीएचडी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले.
संघर्ष समितीच्या वतीने आत्तापर्यंत सात वेळा सत्याग्रह आंदोलन व पदयात्रा काढण्यात आल्या. प्रत्येक वेळी आश्वासन व बैठकीचे आयोजन केले गेले. परंतु अद्यापही प्राध्यापक भरती चालू झालेली नाही. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने 4435 जागांच्या भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर काही ना काही त्रुटी काढत वित्त विभागाने फेर प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदयांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सदर प्रस्ताव सादर करीत असल्याचे सांगितले आहे व पंधरा ते एक महिन्याच्या आत मध्ये प्राध्यापक भरतीचा जीआर काढण्यात येईल असे आश्वासित केले होते. अद्यापही वित्त विभागाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. तेव्हा ताबडतोब प्राध्यापक भरतीचा जीआर ह्या आठवड्यामध्ये काढण्यात यावा. अन्यथा संघर्ष समितीच्या वतीने पुढील आठवड्यात आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.
*विद्यापीठ परीक्षा कामकाजावर बहिष्कार* – जर जीआर ह्या आठवड्यात न निघालेस एप्रिल मे मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठातील परीक्षा कामकाजावर तसेच पेपर तपासणी व इतर अनुषंगिक कामावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. असे संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.