मौनी विद्यापीठातील आय सी आर ई संगणक विभागाच्या विध्यार्थ्यांचे यश एम एस बी टी इ प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक

मौनी विद्यापीठातील आय सी आर ई संगणक विभागाच्या विध्यार्थ्यांचे यश
एम एस बी टी इ प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
श्री मौनी विद्यापीठ गारगोटी येथील इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजीनियरिंग संगणक विभागाच्या तृतीय वर्षातील विध्यार्थ्यांनी एन आय टी कोल्हापूर येथे भरविलेल्या एम एस बी टी इ प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. सर्टिफिकेट ट्रॉफी व रोख रुपये एक लाख असे बक्षीस त्यांना मिळाले.
या स्पर्धेत अमित पुंडेकर ,आदित्य जोगदंडे ,अभिषेक पाटील व राजवर्धन जगदाळे या संगणक विभागातील विध्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. A3R2 City Defender हा प्रोजेक्ट या विध्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी केला होता. या विध्यार्थ्यांचे गाईड डॉक्टर आर व्ही पवार यानी मार्गदर्शन केले.
या विध्यार्थ्यांना श्री मौनी विद्यापीठ गारगोटीचे अध्यक्ष सतेज पाटील, चेअरमन मधुकर देसाई, संचालक डॉक्टर पी बी पाटील, आय सी आर ई चे प्राचार्य जी एस घेवडे, संगणक विभागाचे एच ओ डी संतोष माने व प्राध्यापक, कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले
मौनी विद्यापीठ परिवारातर्फे विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.