क्राईमजिल्हाताज्या घडामोडी

खेडगे गावठी बाॅंबच्या साह्याने रान डुक्कराची हत्या प्रकरण : भुदरगड तालुक्यातील प्राध्यापक अद्यापही फरार

खेडगे गावठी बाॅंबच्या साह्याने रान डुक्कराची हत्या प्रकरण

: भुदरगड तालुक्यातील प्राध्यापक अद्यापही फरार

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
भुदरगड तालुक्यातील खेडगे येथे गावठी बाॅंबच्या साह्याने रान डुक्कराची हत्या केल्या प्रकरणी
सरपंचासह सात जणांना अटक करण्यात आली होती. तपासात प्रा. हिंदूराव रामचंद्र पाटील याचे नाव निष्पन्न झाले होते. प्रा. हिंदुराव पाटील अटकेच्या भितीने फरार झाला. तो अद्याप पोलीसाना मिळाला नाही.
खेडगे येथील दुरगाडी शेतात गावठी बाॅंबच्या साह्याने रानटी डुक्कराची हत्या करण्यात आली. याची माहिती गारगोटी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक यांना मिळताच वनपाल बळवंत शिंदे, एम. बी. काशीद, वनरक्षक वनिता कोळी, आशिष चाळसकर, वर्षा तोरसे, संजय गौड यांनी पाळत ठेवून घरामध्ये झडती घेऊन मासासह रंगेहाथ पकडले. याप्रकरणी
प्रकाश हैबती देसाई (वय-५९), शंकर धनाजी घोरपडे (वय-५०), जनार्दन शिवराम देसाई (वय-५८), सुभाष तुकाराम देसाई (वय-४६), संतोष बबन देसाई (वय-४७), सुभाष बाबासो देसाई (वय-४४), अंतोबा यशवंत कांबळे (वय-७८) यांना अटक करण्यात आली होती. पुढील तपासात बिद्री महिविद्यालयाचे प्रा. हिंदुराव रामचंद्र पाटील (रा. कोनवडे, ता. भुदरगड) याचे नाव निष्पन्न झाले नंतर. याप्रकरणी हिंदुराव पाटीलवर गुन्हा दाखल झाला. प्रा. हिंदुराव पाटील अटकेच्या भितीने फरार झाला. मुलगा अजिंक्य यास समज देऊन सोडून देण्यात आले होते. प्रा. पाटील याची स्विफ्ट गाडी वनविभागाने ताब्यात घेतली .
प्रा. हिंदुराव पाटील याने अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला असल्याची चर्चा आहे.
वनविभागाच्या कायद्यानुसार सर्वसामान्य आरोपीना तात्काळ अटक होते, मग अशा आरोपीना का अटक होत नाही? असा सवाल नागरिक करत आहेत.
  या बाबत गारगोटीचे वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक यांच्याशी सिंहवाणी लाईव्ह न्यूज ने संपर्क साधला असता ते या बाबत म्हणाले आम्ही या गुन्ह्यांचा पाठपुरावा करत आहोत. दाखल झालेला अशा प्रकारच्या आणखी एका गुन्ह्यत आणखी एक शिक्षक आरोपी आहे.

 दरम्यान या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळवला असल्याची माहिती मिळाली अहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button