संपूर्ण भारतभर UPI सेवा ठप्प ! सर्व पेमेंट अॅप्सवर व्यवहारात अडथळे ग्रामीण भागात अधिक परिणाम

संपूर्ण भारतभर UPI
सेवा ठप्प ! सर्व पेमेंट अॅप्सवर व्यवहारात अडथळे
ग्रामीण भागात अधिक परिणाम
सिंहवाणी ब्युरो / मुंबई :
देशभरात बुधवारी संध्याकाळी UPI (Unified Payments Interface) सेवा ठप्प झाली, त्यामुळे अनेक वापरकर्त्यांना ऑनलाईन व्यवहार करताना मोठ्या अडचणी आल्या. Google Pay, PhonePe, Paytm आणि बँकिंग अॅप्सवर पैशांच्या ट्रान्सफरमध्ये अडथळे येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण भागात याचा परिणाम अधिक जाणवला.
UPI च डाऊन झाल्यामुळे तो कोणत्याही ऍपवरुन वापरत्याकर्त्यांनी वापरला तरी देखील पेमेंट करताना अडचणी येत आहेत. त्यानंतर लोकांनी यामागचं कारण शोधण्यासाठी ट्वीटरवर ट्वीट करणं आणि उत्तर शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा ते डाऊन झालं असल्याचं समोर आलं. पण या मागचं कारण कळू शकलेलं नाही.
किती लोकांना झाला त्रास ?
DownDetector च्या माहितीनुसार, सायंकाळी 7:50 वाजेपर्यंत 2,750 तक्रारी नोंदवण्यात आल्या.
-Google Pay वापरकर्त्यांकडून 296 तक्रारी
-Paytm वापरकर्त्यांकडून 119 तक्रारी
-SBI बँकेच्या सेवांबाबत 376 तक्रारी, बहुतांश SBI वापरकर्त्यांनी फंड ट्रान्सफर आणि ऑनलाईन बँकिंग ठप्प झाल्याची तक्रार केली.
UPI सेवा बंद असल्याने अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. एका युजरने X (Twitter) वर लिहिले
“पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात UPI डाऊन असल्याचा अनुभव घेतला. यावेळी बँका किंवा गेटवे नाहीत, तर थेट @UPI_NPCI itself डाऊन आहे!” आणखी एका युजरने लिहिले “हे काय सुरू आहे? UPI काम करत नाही. माझ्या अकाऊंटमधून पैसे डेबिट झाले, पण मित्राच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट झालेच नाहीत! @UPI_NPCI कृपया लक्ष द्या.”
NPCI कडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण नाही
NPCI कडून अजून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे UPI सेवा ठप्प झाल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. वापरकर्त्यांनी थोडा संयम ठेवण्याचे आणि काही वेळांनी पुन्हा व्यवहार करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.