कर्मचाऱ्यांची सातत्याने मागणी असणारी जुनी पेन्शनच कर्मचाऱ्याचे हित साधनारी… माजी आमदार भगवानआप्पा साळुंखे

कर्मचाऱ्यांची सातत्याने मागणी असणारी जुनी पेन्शनच कर्मचाऱ्याचे हित साधनारी…
माजी आमदार भगवानआप्पा साळुंखे
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची सातत्याने मागणी असणारी आणि कर्मचाऱ्यांची हित साधणारी जुनी पेन्शनच आहे. एन पी एस,यु पी एस, आणि आर पी एस या पेन्शन योजना फसव्या आणि कर्मचाऱ्यांची नुकसान करणारी आहे. जुन्या पेन्शनसाठी सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांची शेवटचा लढा दिला पाहिजे यासाठी आपण नेतृत्व करायला तयार आहे असे प्रतिपादन शिक्षक माजी आमदार भगवान आप्पा साळुंखे यांनी केले.ते
भुदरगड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने जुनी पेन्शन वस्तुस्थिती या विषयावर आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते. नवीन पेन्शन योजना विकल्प सादर करून कर्मचाऱ्यांच्या माथी मारली जात असलेने यावर पुन्हा एकदा लढा लढावा लागेल असे मत त्यांनी मांडले. अध्यक्षस्थानी भुदरगडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे होते. यावेळी विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनीही जुनी पेन्शन योजनेसाठी आग्रही असलेचे मत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक भुदरगड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अभिजित पोवार यांनी केले. यावेळी स्पर्धा परीक्षेतून यश मिळवत विविध शासकीय पदावर रुजू झालेल्या निरंजन रेडेकर, शुभम सावंत, सोमनाथ मगदुम इत्यादी भुदरगड तालुक्यातील माध्यमिक कर्मचारी पाल्यांचा सत्कार करणेत आला. अध्यक्षीय मनोगतातून दीपक मेंगाणे यांनी कर्मचारी हक्कासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असलेचे मत व्यक्त केले.
यावेळी कोजीमाशी संचालक पाडूरंग हळदकर, गजानन चव्हाण, संपत कळके, महादेव मोरूस्कर, एम. व्ही. लाड,मिलींद पांगिरेकर,एस. पी. पाटील, प्रकाश पाटील,वजीर मकानदार, विजय रामाणे, प्रकाश सांडुगडे, डि.ए.कांबळे, संतोष पाथरवट, अतुल शिंदे,अजित तोरस्कर, युवराज भादवणकर,रमेश मगदुम, सागर तोंदले, डी. बी. देसाई, विजय देसाई, डी. डी. मांडे, रणजित माडेकर आणि तालुक्यातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नंदकुमार पाटील व आभार आक्काताई नलवडे यांनी मानले