अचलेर मध्ये अवैध धंद्यांनी मांडला उच्छाद : बीट हवालदार यांच्या दुर्लक्षपणामुळे श्री मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेत हातभट्टीची दारू झाली उदंड

अचलेर मध्ये अवैध धंद्यांनी मांडला उच्छाद यांच्या उदंड
सिंहवाणी ब्यूरो l महेश गायकवाड सोलापूर
अचलेर मध्ये अवैध धंद्यांनी सद्या मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे. अचलेर बीट चे
हवालदार यांच्या दुर्लक्षपणामुळे अचलेर व परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे श्री मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेत हातभट्टीची दारू उदंड झाल्यामुळे देवाच्या पालखी मिरवणुकीत दारुड्यानी गोंधळ घातला तर चोरांनी आपले हात ओले करून घेतले
केवळ तीन होमगार्ड यात्रेत बंदोबस्ताला होते वाघमारे मात्र यात्रेत गायब झाले होते.
अचलेर मध्ये यात्रा काळात हातभट्टीची दारू अड्डे बंद करण्यात यावेत तसेच अवैध धंदे बंद करण्यात यावेत अशी मागणी करूनही या कडे पोलिस खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे यात्रेत हातभट्टीच्या दारूचा मोठ्या प्रमाणावर सुकाळ झाला आणि हातभट्टीची दारू विक्री करणारे आणि हातभट्टी अड्डे चालविणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर फावले
यास केवळ पोलिस खात्याचे दुर्लक्ष करणभीत असल्याचे कळते.
अचलेर चे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेस पाच दिवस अवैध धंद्यांना आळा घालण्यात यावे आणि हातभट्टीची दारू अड्डे बंद ठेवण्यात यावे अशी मागणी अचलेर चे बीट हवालदार वाघमारे यांच्याकडे करण्यात आली होती परंतु त्यांनी या मागणी कडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच अचलेर येथे यात्रा काळात आणि दररोजच हातभट्टीची दारू अड्डे सुरू असुन अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे
एस टी स्टँड परिसरात तसेच शाळा परिसरात आणि भीमनगर मध्ये हे हातभट्टीची दारू अड्डे असून गावात सर्वत्र इतर अवैध धंद्यांनी उच्चांक गाठला आहे. गावात सर्वत्र गुटखा राजरोस पाने विक्री केला जात असून हा गुटखा कोण विक्री करतो हातभट्टीची दारू अड्डे कुणाचे आहेत अवैध धंदे कोण करत आहेत हे सर्व पोलिस यंत्रणेला माहिती असून ही त्याकडे पध्दतशीर आणि अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे .
अचलेर गावात सध्या हातभट्टी दारूचा महापूर आला असून याकडे पोलिस यंत्रणेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे गावात तळीरामांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे यात्रेत तळीरामानी मोठ्या प्रमाणावर धिंगाणा घातला ही बाब लज्जास्पद ठरली आहे कावड आणि नंदिकोल घेऊन नाचणाऱ्या सेवेकरी भक्तांच्या मध्ये येऊन त्यांना अडथळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणात तळीरामानी केले त्यामुळे श्री मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेस गालबोट लागले हे गालबोट केवळ गावात सुरु असलेल्या हातभट्टी दारूच्या अड्ड्यामुळे आणि अवैध धंद्यांमुळे लागले आहे.
अचलेर बीट चे हवालदार यांची मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार: संजय रणदिवे
अचलेर मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. त्यांनी या अवैध धंद्यांकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले आहे त्यामुळे त्यांची तक्रार आपण मुख्यमंत्री यांच्याकडे देणार आहे अशी माहिती भीमशक्ति सामाजिक संघटनेने राज्य सचिव संजय रणदिवे यांनी सिंहवाणी शी बोलताना दिली.