मडिलगे बुद्रुक येथे भरधाव चारचाकीने शेतकऱ्याला उडवले चालक तानाजी श्रीकांत माने याच्याविरोधात गुन्हा दाखल

मडिलगे बुद्रुक येथे भरधाव चारचाकीने शेतकऱ्याला उडवले
चालक तानाजी श्रीकांत माने याच्याविरोधात गुन्हा दाखल
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड) येथे गारगोटी-
कोल्हापूर मुख्य रस्त्यावर वाहन भरधाव बेदरकारपणे चालवीत
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चारचाकी वाहनाने शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्याला जोराची धडक दिली. या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रघुनाथ मारुती लोकरे (वय ६२, रा. मडिलगे बुद्रुक, ता. भुदरगड) असे त्यांचे नाव आहे.
याबाबत चालक तानाजी श्रीकांत माने (रा. शेंदूर, ता. कागल, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. या अपघाताची फिर्याद मृताचा मुलगा संतोष लोकरे यांनी दिली आहे. मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड) येथील रघुनाथ ऊर्फ बाळू मारुती लोकरे हा शेतकरी शनिवारी सकाळ साडेसातच्या सुमारास शेतावर जात होते. त्यावेळी मडिलगे बसस्थानका नजीकच्या कोथळकर ओढ्यावर ते रस्ता पार करून शेतावर जात होते. त्याचवेळी कोल्हापूरकडून तानाजी माने हा चारचाकी चालवीत येत होता. दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना त्याच्या दुर्लक्षामुळे रस्ता पार करणाऱ्या लोकरे यांना त्याने पाहिले नाही. त्यांना जोराची धडक बसली. या धडकेत लोकरे हे हवेत उडाले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
+