कर्मवीर हिरे महाविद्यालयामार्फत बी.ए. बी.एड. अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय सामान्य प्रवेश परीक्षेसाठी कार्यशाळेचे आयोजन

कर्मवीर हिरे महाविद्यालयामार्फत
बी.ए. बी.एड. अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय सामान्य प्रवेश परीक्षेसाठी कार्यशाळेचे आयोजन
सिंहवाणी ब्युरो/ गारगोटी –
श्री मौनी विद्यापीठ संचलित कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी जिल्हा कोल्हापूर येथे बी.ए.बी.एड. एकात्मिक अभ्यासक्रम राबविला जातो. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली मार्फत राष्ट्रीय स्तरावर सामान्य प्रवेश परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी घेतली जाणार आहे. यापूर्वी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा राज्य सामायिक परीक्षा कक्षामार्फत घेतली जात होती परंतु राष्ट्रीय अध्यापक परिषद, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार शैक्षणिक वर्ष 2025- 26 पासून सदर बी. ए.बी.एड. एकात्मिक अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA) मार्फत परीक्षा घेऊन प्रवेश दिला जाणार आहे. या परीक्षेला बसलेल्या/प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन परीक्षा कशी द्यावयाची, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती इतर पूर्वतयारी, ऑनलाइन परीक्षेचा सराव विद्यार्थ्यांना होण्याकरता आणि एकूणच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन
कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी , जि.कोल्हापूर शुक्रवार दि.11 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 ते 1.00 या वेळेत करण्यात आलेले आहे. सदर कार्यशाळा ही पूर्णपणे मोफत असून चार वर्षीय बी.ए. बी.एड./बी.एससी. बी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा व सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रवेश समितीचे प्रमुख प्रा.आहेर (8999491233) प्रा.मेढेकर (9421138872) या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. उदय कुमार शिंदे यांनी केले आहे.