जिल्हाताज्या घडामोडी

कुडाळ पोलीसातील हवालदाराने केली आत्महत्या : सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अस्वस्थेत मृतदेह आढळला

कुडाळ पोलीसातील हवालदाराने केली आत्महत्या :

सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अस्वस्थेत मृतदेह आढळला 

 

सिंहवाणी ब्यूरो / कुडाळ
कुडाळ पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत असलेल्या सुरज अनंत पवार (वय ३१ वर्षे, रा. मळगाव-कुंभार्लीवाडी, ता. सावंतवाडी, सध्या रा. कुडाळ) याचा मृतदेह ते राहत असलेल्या फ्लॅट मध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अस्वस्थेत आढळून आला. तपासाअंती सूरज यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सुरज अनंत पवार हे कुडाळ पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते. अलीकडेच काही महिन्यांपूर्वी आवळेगाव दूरक्षेत्र येथून ते कुडाळ पोलीस ठाण्यात हजर झाले होते. ते कुडाळ मधील कॉम्प्लेक्स मध्ये एकटेच राहत होते.

आज दुपारी त्याच्या मित्राच्या मोबाईल वर त्यांनी ‘तुला कुडाळला यावेच लागेल, मी जीवन संपवीत आहे’ अशा आशयाचा मेसेज टाकला. त्या मित्राने याची कल्पना त्याचा मळगाव येथील भावाला दिली. ते तातडीने कुडाळला आले. तो राहत असलेल्या फ्लॅटवर गेले असता बाहेरुन कुलूप लावलेले होते. परंतु किल्ली बाहेर ठेवलेली होती. त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सुरज पवार पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले. सुरज यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button