संघर्ष समितीच्या सत्याग्रह आंदोलनाला यश, प्राध्यापक भरती प्रक्रियेला वेग* मंत्री महोदयाकडून आश्वासक शब्द

संघर्ष समितीच्या सत्याग्रह आंदोलनाला यश, प्राध्यापक भरती प्रक्रियेला वेग*
मंत्री महोदयाकडून आश्वासक शब्द
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
नेट सेट पीएच. डी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत दि. 7 एप्रिल 2025 पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत सत्याग्रह आंदोलन-8 चालू होते. आज सहाव्या दिवशी माननीय नामदार इंद्रनील नाईक साहेब ( राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण ) यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असून प्राध्यापक पद भरतीच्या फाईलला योग्य ती गती देणेत आलेली आहे. लवकरच पद भरतीच्या फाईलवर कार्यवाही होत असून समयबद्ध प्रक्रिया पूर्ण करण्याचा आश्वासक शब्द मंत्री महोदयाकडून संघर्ष समितीच्या शिस्ट मंडळाला देण्यात आला. अत्यंत विपरीत परिस्थितीत संघर्ष समितीच्या समन्वयकानी निकराचा लढा देत कार्यवाही निर्णायक परिस्थितीत आणून ठेवलेली आहे.
ह्या आंदोलन प्रसंगी शिस्त मंडळामध्ये राज्य समन्वयक डॉ. प्रमोद तांबे, प्रा. जोतीराम सोरटे, डॉ.भारत राठोड,डॉ. रमेश वाघमारे, डॉ. सचिन बोधने, डॉ. युवराज. कठाळे, डॉ. सूर्यवंशी सर,डॉ. सचिन आबिटकर, प्रा. किरण पाटील, डॉ. दादा ननावरे, प्रा अजय बनसोडे, डॉ. परमेश्वर भोसले, प्रा. तायडे, आदि राज्य समन्वयक व राज्य समन्वय समिती सदस्यांनी सर्व आंदोलनाच्या नियोजनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
*एप्रिल अखेरपर्यंत प्राध्यापक भरती चा जीआर अपेक्षित आहे. मंत्री महोदयांच्या मध्यस्थीने प्राध्यापक भरती प्रक्रिया आता गतिमान झाली आहे. संघर्ष समितीला यश येताना दिसत आहे ”
समन्वयक
प्रा. जोतीराम सोरटे
नेट सेट पीएचडी संघर्ष समिती