कर्मवीर हिरे महाविद्यालयात बी.ए.बी.एड. (ITEP-NCET) मार्गदर्शन सत्र यशस्वी; भावी शिक्षकांसाठी ठरले दिशादर्शक

कर्मवीर हिरे महाविद्यालयात बी.ए.बी.एड. (ITEP-NCET) मार्गदर्शन सत्र यशस्वी;
भावी शिक्षकांसाठी ठरले दिशादर्शक
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी,
श्री मौनी विद्यापीठाच्या अधिपत्याखालील कर्मवीर हिरे कला, शास्त्र, वाणिज्य आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी बी.ए.बी.एड. (ITEP-NCET) या राष्ट्रीय पातळीवरील नवीन एकात्मिक शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमासाठी उद्बोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना NCET (National Common Entrance Test) परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, तयारीचे नियोजन आणि संभाव्य करिअर संधी यासंबंधी सखोल माहिती देणे हा होता.

कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ सकाळी 10.00 वाजता डॉ. जे. पी. नाईक सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. (डॉ.) उदयकुमार शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अरविंद चौगले (मौनी विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य) आणि प्रा. डॉ. संजय देसाई (उपप्राचार्य), ITEP विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. शशिकांत चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व संचालन प्रवेश समितीचे प्रमुख प्रा. विशाल आहेर व प्रा. रामचंद्र मेढेकर यांनी केले,
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. उदयकुमार शिंदे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने सन २०३० पर्यंत देशात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित शिक्षकांची गरज भासणार असल्याचे नमूद केले. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रातील संधींची जाणीव ठेवून ज्ञान, कौशल्ये आणि अनुभवांच्या आधारे स्वतःला समृद्ध करणे अत्यावश्यक आहे, कारण शिक्षक हाच देशाच्या भावी पिढीचा शिल्पकार आहे, असे महत्त्वपूर्ण विचार त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय देसाई यांनी कर्मवीर हिरे महाविद्यालयातील बी.ए. बी.एड. विभागातील प्राध्यापक वृंद विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा योग्य लाभ घेऊन परीक्षेत यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना परीक्षेची प्राथमिक माहिती देण्यात आली. प्रा. विशाल आहेर यांनी NCET परीक्षेची सामान्य माहिती दिली. त्यानंतर भाषा १ (हिंदी) विषयावर प्रा. संतोष कांबळे, भाषा २ (मराठी) विषयावर प्रा. शिवाजी देसाई यांनी मार्गदर्शन केले. सामान्य चाचणी विषयावर प्रा. डॉ. जयसिंग कांबळे यांनी सखोल माहिती दिली तर शिक्षक अभिक्षमता या विभागावर प्रा. विनोद बर्डे यांनी उपयुक्त टिप्स दिल्या.या सत्रासाठी प्रा. राजरत्न अध्यक्षस्थानी होते.
द्वितीय सत्रात विषयनिहाय अभ्यास व तयारीवर भर देण्यात आला. प्रा. विक्रम राऊत यांनी समाजशास्त्र व अर्थशास्त्र विषयांवर, प्रा. सुशांत शिंदे यांनी इतिहास व राज्यशास्त्र, तर प्रा. संजय पाटील यांनी भूगोल, पर्यावरण व पूरक विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. रामचंद्र मेढेकर यांनी परीक्षेसंदर्भातील अंतिम सूचना दिल्या. प्रा. विनोद बर्डे यांनी आभारप्रदर्शन करून सत्राची सांगता केली.दुसऱ्या सत्रासाठी पी. बी.पाटील अध्यक्षस्थानी होते.
या मार्गदर्शन सत्रांमधून विद्यार्थ्यांना NCET परीक्षेचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, गुणांकन प्रणाली, वेळ व्यवस्थापन, उपयुक्त साहित्य व ऑनलाईन संसाधने यासंबंधी सुस्पष्ट माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ते परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे करू शकतील. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक होण्याची प्रेरणा जागृत करत, कर्मवीर हिरे महाविद्यालयाने शिक्षकी क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या नवोदितांसाठी एक दिशादर्शक आणि प्रेरणादायी उपक्रम सादर केला .
कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्यामनीषा “कार्यक्रमाचे व्यवस्थापन उत्कृष्ट सादरीकरण चांगले उत्कृष्ट माहिती दिली.”
पूजा
“सर्वच सरांनी खूप छान मार्गदर्शन केले खूप छान पद्धतीने उद्बोधन वर्ग राबविण्यात आला”.
अंकिता
“ माहिती चांगल्या पद्धतीने सांगितली व आम्हाला चांगल्या प्रकारे समजली”,
आसावरी
“समजावून सांगण्याची पद्धत आवडली. प्रत्येक विषयाचे मुद्देसूद विश्लेषण करून सांगण्यात आले”,
साक्षी
“कार्यक्रम खूप छान झाला असाच कार्यक्रम होत राहावा.
स्नेहा ,”
नियोजन खूप मस्त केले होते. सर्व शिक्षकांनी माहिती खूप छान दिली आहे माझ्या सर्व शंका दूर झाल्या मी शिक्षकांची आभारी आहे..
माधवी
“सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र या विषयी माहिती असेच प्रश्न कसे सोडवावेत याची सोपी पद्धत खूप छान प्रकारे सांगितली. आम्हाला सर्व माहिती उत्कृष्टरित्या सर्व शिक्षकांनी समजावून सांगितली आहे”.
वेदिका
“ कार्यक्रमाची व्यवस्था चांगली होती त्यामुळे कार्यक्रम आवडला”.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी.ए. बी.एड.च्या प्रा.सौ.शुभांगी सूर्यवंशी, शुभांगी पाटील , अनिता मतीवडे, प्रा. सौ.वंदना सुतार या सर्वांनी मेहनत घेतली.