जिल्हाताज्या घडामोडी

श्रीहरी काका गोसावी मठाने शिक्षण शिष्यवृत्ती द्वारे सीमा भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्राध्यापिका सुषमा पाटील .

श्रीहरी काका गोसावी मठाने शिक्षण शिष्यवृत्ती द्वारे सीमा भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

प्राध्यापिका सुषमा पाटील .

सिंहवाणी ब्युरो / हत्तरगी
जिद्द , चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य यासह गुरुजनांचे आशीर्वाद लाभल्यास आपल्याला यश प्राप्त होते .त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी श्रमाला प्रतिष्ठा देऊन विविध क्षेत्रात यश संपादन संपादन करण्यासाठी नेहमीच प्रयत्नांची पराकाष्टा करावी. गेली दोन दशके श्रीहरी काका गोसावी भागवत मठाने सीमा भागातील गोरगरीब, यशवंत, गुणवंत आणि गरजूत विद्यार्थ्यांना एकनाथ महाराज गोसावी यांच्या पुण्यतिथी निमित्त शिक्षण शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहन दिले आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. असे प्रातिपादन प्राध्यापिका सुषमा पाटील यांनी केले. श्रीहरी काका गोसावी भागवत मठाचे पिठाधीश डॉक्टर आनंद गोसावी यांच्या सानिध्यात दीड लाख रकमेची शिक्षण शिष्यवृत्ती 100 हून अधिक विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली. यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे सर्कल पोलीस इन्स्पेक्टर जावीद मुसाफिरि, गट शिक्षणाधिकारी सौ. प्रभावती पाटील,
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर वर प्रतिबंध लस संदर्भात विशेष योगदान दिलेल्या यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉक्टर राधिका नंदकुमार जोशी .
यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त रामचंद्र कुलकर्णी होते.

हत्तरगी येथील श्रीहरी काका गोसावी भागवत मठात प्रति वर्षाप्रमाणे सीमा भागातील यशवंत, गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. पीयूसी (इयत्ता बारावी) परीक्षेत 90% गुण मिळवलेल्या अनुराधा सोमांना पाटील राहणार मनगुती हिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्राध्यापिका सुषमा पाटील म्हणाल्या शिक्षण शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सीमा भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम विश्वस्त मंडळांने केले आहे. प्रभावती पाटील म्हणाल्या ग्रामीण व सीमा भागातील विद्यार्थ्यांना श्रीहरी काका मठातर्फे शिक्षण शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे कार्य उल्लेखनीय आहे .डॉक्टर राधिका जोशी म्हणाल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्री यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर सीमा भागात देखील श्रीहरिकाका गोसावी मठाच्या माध्यमातून विशेष लसीकरण मोहीम हत्तरगी येथे राबविण्यात येणार आहे .त्याचा लाभ नऊ ते 26 वयोगटातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.

जाविद मुसापुरी म्हणाले आजचा युवक व्यसनाधीन आणि डॉल्बीमध्ये गुंग झाला आहे. शिक्षणाकडे त्याचे दुर्लक्ष होत आहे. युवा पिढी भरकटत चालली आहे .पालक व शिक्षकांनी विविध मठ, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून भरकटलेल्या पिढीला योग्य मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे. त्यासाठी अध्यात्मिकतेची जोड दिली पाहिजे. यावेळी पिठाधीश डॉक्टर आनंद गोसावी यांचे आशीर्वचन झाले .ते म्हणाले ,”आजच्या आधुनिक युगात प्रत्येक जण भौतिक साधनांच्या मागे लागला आहे. त्यामुळे ताण तणाव वाढल्या आहेत, त्यापासून दूर राहण्यासाठी अध्यात्म आणि योग साधना आवश्यक आहे.”

प्रास्ताविक डॉक्टर प्राध्यापक सुनील देसाई यांनी केले. .स्वागत डॉक्टर श्रीशैल मठपती यांनी केले. आभार नंदकुमार माळी यांनी मानले. सूत्रसंचालन रावसाहेब मुर्गी व सिद्धाप्पा तबरी यांनी केले. कार्यक्रमास सीमा भागातील विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button