जिल्हाताज्या घडामोडी

शासकीय कामात अडथळा निर्माण केला.. शिवसेना उपजिल्हाप्रमुख, भाजपचे माजी तालुकाध्यक्षासह आंदोलनकर्त्या तिघांवर भुदरगड पोलीसात गुन्हा दाखल

शासकीय कामात अडथळा निर्माण केला..

शिवसेना उपजिल्हाप्रमुख, भाजपचे माजी तालुकाध्यक्षासह आंदोलनकर्त्या तिघांवर भुदरगड पोलीसात गुन्हा दाखल

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
कडगाव वनपरिक्षेत्र कार्यालय येथे आंदोलनकर्त्यांना शासकीय मालमत्तेची तोडफोड, जाळपोळ करण्याचे आवाहन केले तसेच वनकर्मचा-यांना काम करण्यास अटकाव करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केले प्रकरणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख, माजी तालुकाध्यक्षासह तिघांवर भुदरगड पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
कडगाव य वन परिक्षेत्र अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की 24 मार्च 2025 रोजी पिकनुकसानी बद्दल तसेच इतर विविध मागंणीबद्दल कडगाव वनपरिक्षेत्र कार्यालय येथे लोकांना एकत्रित करुन शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील ,(रा. पाचर्डे), भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अनिल तळकर (रा. वेसर्डे) व प्रकाश डेळेकर (रा. थड्याचीवाडी) यांचे नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरु केले. सदर आंदोलनामध्ये प्रकाश पाटील, अनिल तळकर, व प्रकाश डेळेकर र या तिघांनीही प्रक्षोभन भाषण करुन आंदोलनाकरीता जमलेल्या लोकांना शासकीय मालमत्तेची तोडफोड, जाळपोळ करण्याचे आवाहन केले. तसेच त्या दिवशी मला व वनकर्मचा-यांना त्यांचे काम करण्यास अटकाव केला याचबरोबर वनपरिक्षेत्र कडगाव मधील वनकर्माचा-यांना जंगलामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात येइल व फिरताना दिसल्यास मारहाण करण्यात येइल असे धमकीवजा वक्तव्य देखील केले. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button