क्राईमजिल्हाताज्या घडामोडी

लग्नाला पाहूणा म्हणून आला.. अन लाखोचा हात मारला दागिन्यांवर डल्ला मारणारा सराईत आदमापूरात जेरबंद

लग्नाला पाहूणा म्हणून आला.. अन लाखोचा हात मारला

दागिन्यांवर डल्ला मारणारा सराईत आदमापूरात जेरबंद

सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर
मंगल कार्यालयामधून सोन्याचे दागिने,
रोकड असलेली पर्स, पिशवी अज्ञाताकडून लंपास करण्याचे प्रकार अनेकवेळा समोर आले आहेत. अशाच एका प्रकारात पाहुणा म्हणून लग्नात येऊन आणि कोल्हापुरी फेटा बांधून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील (वय २८, रा. आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) याला अटक केली आहे. त्याच्याकडून ३ लाख ७८ हजार ४७० रूपये किंमतीचे ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली.

शहरासह ग्रामीण भागात सध्या लग्नसराई सुरू आहे. मंगल कार्यालयामधून सोन्याचे दागिने, रोकड असलेली पर्स, पिशवी अज्ञातांकडून लंपास केल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार कळमकर यांनी तपास पथके तयार करून कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला होता. त्याआधारे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी रेकॉर्डवरील आरोपी बाळासो उर्फ अजित याला आदमापूर येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची सखोल चौकशी केली असता त्यांने जय पॅलेस कळंबा आणि सृष्टी फार्म हाऊस, हणबरवाडी, कोल्हापूर येथील मंगल कार्यालयातून चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ३ लाख ७८ हजार ४७० रूपयांचे ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, बाळासो उर्फ अजित याच्याविरूद्ध घरफोडी, जबरी चोरीचे २१ गुन्हे कोल्हापूर, पुणे येथे दाखल झालेले आहेत. त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे – पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस उपनिरीक्षक शेषे मोरे, सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी, अमित सर्जे, अनिकेत मोरे, समीर कांबळे, राजू कांबळे, विनोद कांबळे, प्रविण पाटील, हंबीर अतिग्रे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button