जिल्हाताज्या घडामोडी
पन्हाळा संजीवन विद्यालय निवासी प्रशालेचा इयत्ता 10 वी CBSC चा निकाल 100 टक्के

पन्हाळा संजीवन विद्यालय निवासी प्रशालेचा इयत्ता 10 वी CBSC चा निकाल 100 टक्के

सिंहववणी ब्यरो /पन्हाळा :
येथील संजीवन विद्यालय या निवासी प्रशालेचा इयत्ता 10 वी CBSC चा निकाल 100 टक्के लागलेला आहे. प्रशालेने याही वर्षी आपली 100% निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.
स्वरूप महेश आंगणे याने 93.20% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. प्रणव अंकुश पाटील याने 92.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर प्रत्येकी 91.00% गुण मिळवून स्वरांगी आंगणे व दानीश मोमीन यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
परीक्षेला प्रविष्ट झालेल्या 72 विद्यार्थ्यांपैकी 40 विद्यार्थ्यानी विशेष गुणवत्ता प्राप्त केली असून
32 विद्यार्थ्यानी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन पी.आर.भोसले,सह सचिव एन. आर.भोसले,प्राचार्य महेश पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले.