भुदरगड पोलीसांनी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यातील १६ तोळे दागिने फिर्यादींना केले परत

भुदरगड पोलीसांनी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यातील १६ तोळे दागिने फिर्यादींना केले परत
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी:
भुदरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यातील जप्त केलेले
१६ तोळे वजनाचे सोन्याचे दागीन्याचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. भुदरगड पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल समाधान व्यक्त होत आहे.
दोन महिन्यांपूर्वी आदमापूर येथून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 40 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले होते याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरण लोंढे व उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी कसुन तपास करुन सहा आरोपींना अटक केली होती.
त्यांच्याकडून ४० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले होते. गारगोटीतील एका लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांचे १२ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. पोलीसांनी कसून तपास करुन जप्त केले होते. या तिन वेगवेगळ्या गुन्ह्यातील सुमारे १६ तोळे सोन्याचे दागिने फिर्यादींना परत केले.
फोटो
फिर्यादींना सोन्याचे दागिने केले परत करतांना उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक किरण लोंढे, उपनिरीक्षक जीवन पाटील आदी.