*वित्त विभागातील प्राध्यापक भरतीची फाईल मंजुरीसाठी संघर्ष समिती मार्फत मंत्री आबिटकर, मुश्रीफ यांना निवेदन*

*वित्त विभागातील प्राध्यापक भरतीची फाईल मंजुरीसाठी
संघर्ष समिती मार्फत मंत्री आबिटकर, मुश्रीफ यांना निवेदन*
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी-
– नेट सेट पीएच.डी. धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत प्रा. जोतीराम सोरटे, समन्वयक संघर्ष समिती व डॉ. सचिन आबिटकर यांनी वित्त विभागातील प्राध्यापक भरतीची फाईल मंजुरीसाठी मंत्री प्रकाश आबिटकर व मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले व वित्त विभागातील प्राध्यापक भरतीची फाईल मंजुरीसाठी सहकार्य
करण्याची विनंती केली.
मागील सात वर्षांपासून संघर्ष समिती मार्फत आत्तापर्यंत सात वेळा सत्याग्रह आंदोलन व पदयात्रा या माध्यमातून प्राध्यापक भरतीचा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मंजूर करून घेऊन वित्त विभागापर्यंत पोहोचविण्यात यश मिळविले आहे.परंतु वित्त विभागातील प्राध्यापक भरतीच्या फाईलला अजून मंजुरी मिळालेली नाही. उच्चाधिकार समिती व वित्तमंत्री यांचे मार्फत फाईल मंजूर करून घेण्यासाठी समितीच्या वतीने मंत्रिमहोदयांना निवेदने देण्यात आली. जर नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवायची असेल तर राज्यातील प्राध्यापक भरती होणे आवश्यक आहे. अन्यथा मनुष्यबळा अभावी नवीन शैक्षणिक धोरणाचा खेळ खंडोबा होईल व बहुजन वर्गातील मुला मुलींच्या शिक्षणाचे नुकसान होईल. तसेच मागील बारा वर्षापासून राज्यात प्राध्यापक भरती नसल्यामुळे अनेक सीएचबी धारक प्राध्यापकांचे आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा सरकारने ताबडतोब वित्त विभागातील फाईल मंजूर करून प्राध्यापक भरती करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.