*गारगोटीत मोठ्या उत्साहात तिरंगा पदयात्रा* *आजी-माजी सैनिकांसह अबाल वृद्धांचा सहभाग .*

*गारगोटीत मोठ्या उत्साहात तिरंगा पदयात्रा*
*आजी-माजी सैनिकांसह अबाल वृद्धांचा सहभाग .*

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या धारांची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता देश प्रेमाने भारावलेल्या वातावरणात आज गारगोटी येथे तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली .
22 एप्रिल रोजी पहेलगाम येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला त्याचा बदला घेण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर या नावाने पाकिस्तान मधील 11 दहशतवादी स्थळ एअर स्ट्राइक द्वारे उद्ध्वस्त करण्याचे काम केले. या ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तान मधील जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला .भारतीय सेनेच्या या अतुलनीय पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी व भारतीय सेनेचे मनोबल वाढवण्यासाठी देशभरामध्ये तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहाने सुरू आहेत .आज गारगोटी शहरांमध्ये सुद्धा या तिरंगा पद यात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते भुदरगड तालुका आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या या तिरंगा पदयात्रेमध्ये आबाल वृद्धांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला .
आकाशातून येणाऱ्या प्रचंड पावसाच्या धारा याची तमाम बळकता देश प्रेमाने भारावलेले नागरिक “भारत माता की जय , वंदे मातरम , हिंदुस्तान जिंदाबाद , पाकिस्तान मुर्दाबाद , अशा घोषणा देत गारगोटीच्या रस्त्यावरून चालत होते .
या पदयात्रेमध्ये माजी सैनिक संघटना , अभिनव करिअर अकॅडमी कोनवडे शाहू करिअर अकॅडमी कोनवडे मौनी करिअर अकॅडमी गारगोटी या सर्व अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला त्यांच्याबरोबरच भुदरगड तालुक्यातील देश प्रेमी नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले होते .
प्रत्येकाच्या हातात तिरंगी ध्वज ऑपरेशन सिंदूर चे पोस्टर आणि तोंडात भारत मातेचा जयघोष अशा देश प्रेमाने भारावलेल्या वातावरणाने आज गारगोटी शहर दुमदुमून गेले .
विद्या मंदिर आकुर्डे तालुका भुदरगड या प्राथमिक शाळेतल्या बालचमुननी छत्रपती शिवाजी महाराज ,भारत माता आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांची वेशभूषा करून ,पदयात्रेमध्ये सहभाग घेतला या सर्व बालचमूचा देश प्रेमाने भारावलेला उत्साह पाहून साऱ्या गारगोटी करांचे लक्ष वेधून घेतले .
या पदयात्रेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर गारगोटीचे सरपंच प्रकाश वासकर प्रवीण सिंह सावंत कॉम्रेड सम्राट मोरे व्यापारी असोसिएशनचे विश्वनाथ घाटगे श्री कारेकर,नंदकुमार शिंदे मोहन सूर्यवंशी , विनायक पाटील , भाजपचे तालुकाध्यक्ष नामदेव चौगुले संतोष पाटील रविंद्र कामत, पांडूरंग वायदंडे , रणधीर शिंदे, अमोल पाटील भगवान शिंदे सुनिल तेली, पी बी खुटाळे , राहूल चौगले प्रशांत पुजारी,सौ ऐश्वर्या पुजारी, राहूल जाधव ‘ संजय भोसले अवधूत राणे , सचिन देसाई , विक्रम पवार, बबन निकम, निवास देसाई, अमृत गुरव विनायक शिंदे ‘ विरकुमार पाटील,अविनाश कवडे ,आजी माजी सैनिक संघटनेचे गोपाळ कांबळे , सर्जेराव मेंगाणे , दत्तात्रय साळवी , दत्त्तात्रय भोईटे, दिनकर कांबळे , शाम सुंदर शेळोलीकर, श्री. दिलीप चव्हाण, विश्वास पाटील, प्रकाश मोरस्कर , बाळासाहेब पाटील , बचाराम भाईंगडे ,किरण भोईटे , राजु कोराणे
यांचेसह नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते .
प्रारंभी स्वागत माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष नारायण देसाई यांनी केले आभार योगेश परुळेकर यांनी मानले .