क्राईमताज्या घडामोडी

अल्पवयीन मुलीच्या अपहरणासह अत्याचार : आरोपी पळून गेल्याप्रकरणी कॉन्स्टेबल निलंबित; इतरांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

अल्पवयीन मुलीच्या अपहरणासह अत्याचार :

आरोपी पळून गेल्याप्रकरणी कॉन्स्टेबल निलंबित;
इतरांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर ः
सीपीआरमधून आरोपी पळून गेल्याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल महेश दिलीप नाईक यांना निलंबित करण्यात आले. तसेच याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षकासह काही जणांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. शिस्तभंगाच्या कारवाईसाठी सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, उपनिरीक्षक नाथा गाळवे, मनीषा महाडिक, स्नेहल टकले, अंमलदार तानाजी गुरव, बळीराम पोतरे आणि अविनाश कांबळे यांची चौकशी सुरू झाली आहे.

अल्पवयीन मुलीच्या अपहरणासह अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी रोहीत ऊर्फ गणेश गुंडाजी नंदीवाले (वय 22, रा. कोथळी, ता. करवीर) याला अटक केली होती. 15 मे रोजी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणले असता तो हिसडा मारून पळून गेला होता.

रोहित पळून जाणार होता राजस्थानला

रोहित ऊर्फ गणेश नंदीवाले पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्यानंतर घरी गेला. कुटुंबीयांकडून त्याने वीस हजार रुपये घेतले. त्यानंतर तो थेट तिरुपतीला गेला. तिरुपतीमध्ये दर्शन घेतल्यानंतर त्याने केस अर्पण केले. आपल्याला कोणी ओळखू नये हा त्याचा उद्देश होता. त्यानंतर तिरुपतीहून तो थेट मिरजेत आला. मिरजेत मित्रांना भेटून तो पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी राजस्थानला पळून जाणार होता. तेवढ्यात मागावर असलेल्या पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button