मतदारसंघातील निवडणुका ताकदीने लढवणार, ,आमदार रोहीत पाटील यांची तासगावात घोषणा

तासगाव मतदारसंघातील निवडणुका ताकदीने लढवणार
,आमदार रोहीत पाटील यांची तासगावात घोषणा
सिंहवाणी ब्युरो / राजू थोरात, तासगाव
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका महा विकास आघाडी एकसंघपणे लढणार असल्याची घोषणा तासगाव कवठेहांकाळचे आमदार रोहीत पाटील यांनी केली.ते तासगाव येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.यावेळी मतदारसंघातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना आमदार रोहीत पाटील म्हणाले,पुढील काळात जिल्हा परिषद,पंचायत समिती सह नगरपालिका निवडणुका होणार आहेत.या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तयार रहावे.उमेदवारीची घोषणा करत असताना सर्वाँना विश्वासात घेऊन केली जाईल.पक्षाचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी ठामपणे ताकद उभा करून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.जिल्हा परिषदेसह पंचायत समिती आणि नगरपालिकेत सत्ता यावी यासाठी आत्ता पासूनच तयारी करा.तासगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासह एकहाती सत्ता यावी यासाठी प्रयत्न करा.
तालुक्यात एम.आय.डी.सी.उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी संपर्क साधून उद्योग उभा करावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.अनेक कंपन्यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.उद्योग उभा राहिले नंतर तरुणांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.काहीजण कंपन्यांची दिशाभूल करत आहेत.जुन्या गोष्टी उकरण्याचा प्रयत्न करत आहेत.जुन्या गोष्टी उकरल्या तर तुमच्या जुन्या गोष्टी बाहेर काढू असा इशारा विरोधकांना दिला.
विधानसभेच्या निवडणुकीत अनेक गावात अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही.आगामी निवडणुकीत असे होऊ नये.सर्व मतदारसंघातील उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील यासाठी प्रयत्न करा.निवडणुकीत गाफील न राहता निवडणुकीला सामोरे जावे.तासगाव तालुका जिल्ह्यातील मध्य म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.विधानसभा निवडणुकी नंतर मतदारसंघात सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले.यावेळी सतीश पवार,मोहन पाटील,संजय पाटील,अर्जुन पाटील,ताजुद्दिंन तांबोळी , एम.बी.पवार,नलिनी पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आभार कार्याध्यक्ष संजय पाटील यांनी मानले.
बैठकीस शंकर दादा पाटील,युवक अध्यक्ष दत्ता हावळे, शहर अध्यक्ष ॲड.खुजट,कमलताई पाटील, डी.के.पाटील,संभाजी पाटील,रामचंद्र जाधव सर्व आजी माजी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,अनेक गावातील सरपंच,सर्व संस्थचे पदाधिकारी व सदस्य,पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी खासदार संजय पाटील व आमदार रोहित पाटील यांच्यात पुन्हा संघर्ष पहायला मिळणार आहे, स्व आर आर आबा पाटील व संजय पाटील यांचा संघर्ष पूर्ण राज्याने पहिला आहे, आमदार सुमन पाटील व माजी खासदार संजय पाटील यांचा संघर्ष पूर्ण मतदारसंघाने पाहिला आहे,काही निवडणूकमध्ये जोरदार राडाही झाला होता, आता आमदार रोहित पाटील विरुद्ध माजी खासदार संजय पाटील यांचा संघर्षं जिल्ह्याला पहायला मीळणार
आमसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन
तासगाव मध्ये पंचायत समितीच्या आमसभेचे आयोजन केले आहे.मी जनतेच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.तालुक्यातील जनेतेने आपल्या समस्या,अडचणी आमसभेत मांडाव्यात.त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू.सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील समस्या मांडाव्यात.असे आवाहन आमदार रोहीत पाटील यांनी केले.