ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे १० पुरस्कार जाहीर , आचार्य जांभेकर मराठी पत्रकार राज्य पुरस्कार जेष्ठ पत्रकार किशोर आबिटकर यांना,

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे १० पुरस्कार जाहीर ,
आचार्य जांभेकर मराठी पत्रकार राज्य पुरस्कार जेष्ठ पत्रकार किशोर आबिटकर यांना,

सिहवाणी ब्युरो / नवी मुंबई
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल (AJFC) यांच्या वतीने २०२५ साठी देण्यात येणाऱ्या विविध दहा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून येत्या ७ जून रोजी पनवेल येथे आंतरराष्ट्रीय पत्रकार जतिन देसाई यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सिंहवाणी चे संपादक जेष्ठ पत्रकार किशोर आबिटकर यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकार राज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे: AJFC चे विश्वस्त अतुल होनकळसे यांनी निवड समिती मार्फत पुरस्कार जाहीर केले.
पुरस्कार विजेत्यांची नावे;
जीवन गौरव पुरस्कार:
श्री. शैलेंद्र शिर्के,
संपादक, दैनिक पुण्यनगरी, नवी मुंबई.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकार राज्य पुरस्कार:
जेष्ठ पत्रकार श्री. किशोर आबिटकर,
गारगोटी.
दैनिक सागर संपादक नानासाहेब जोशी स्मृती राज्य पुरस्कार:
श्री. वैभव पाटील, दैनिक पुढारी, सातारा.
मूकनायक वर्तमानपत्राचे पहिले संपादक पांडुरंग नंदराम भटकर मूकनायक पत्रकारिता पुरस्कार: श्री. दत्तात्रय उकिरडे,
अहिल्यानगर, दैनिक सकाळ.
साप्ताहिक ससेमिरा संपादक मधुकर लोंढे स्मृती ग्रामीण वार्ताहर पुरस्कार:
दीपक घोसाळकर,
नवी मुंबई, दैनिक पुढारी.
भंडारी समाज नेते स्व. शरददादा बोरकर ग्रामीण कार्यकर्ता राज्य प्रेरणा पुरस्कार:
संतोष ढोरे, पनवेल,
वृद्धाश्रम सेवा.
कर्तव्यदक्ष अधिकारी राज्यस्तरीय पुरस्कार: श्री. सुनील आटपाडकर,
सामाजिक विकास अधिकारी, एमएमआरडीए प्राधिकरण, मुंबई.
दलितमित्र रमाकांत आर्ते स्मृती सामाजिक कार्यकर्ता राज्य पुरस्कार:
बजरंग सोनवणे, मुंबई.
वरिष्ठ पत्रकार नवीन सोष्टे स्मृती विभागीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार:
निलेश नवघरे, अकोट तालुका,
दैनिक तरुण भारत नागपूर
मधु रावकर पत्रकार प्रेरणा पुरस्कार:
दयानंद मांगले, देवगड,
दैनिक रत्नागिरी टाइम्स
जयानंद मठकर स्मृती विभागीय मराठी पत्रकार पुरस्कार:
प्रकाश वळंजू, राजापूर
दैनिक तरुण भारत, बेळगाव
यांची निवड झाली आहे
या पुरस्कार सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.