सासरच्या जाचास कंटाळून चिमगावच्या विवाहितेची आत्महत्या : गेली 18 वर्षे जाच नवरा सासू- सासऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सासरच्या जाचास कंटाळून चिमगावच्या विवाहितेची आत्महत्या : गेली 18 वर्षे जाच
नवरा सासू- सासऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
सासरच्या जाचास कंटाळून चिमगाव तालुका कागल येथील विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. ही विवाहिता गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता होती. याप्रकरणी मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून मुरगूड पोलिसांनी नवरा, सासू-सासरे या तिघांना ताब्यात घेतले आहे. सासरच्या मंडळींनी विवाहितेचा कित्येक वर्षे छळ केला आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी विवाहितेचे भाऊ संग्राम प्रकाश पाटील आणि अनिल मारुती पाटील यांनी केली आहे.
याविषयी घटनास्थळावरून आणि नातेवाईकाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी शुभांगी विश्वास लोंढे हिचा विवाह अठरा वर्षांपूर्वी विश्वास याच्याशी झाला होता लग्नानंतर काही दिवसात सासू-सासरे नवरा यांनी तिचा छळ चालू केला. तिचे माहेरला येणे जाणे बंद केले. इतकेच काय पण माहेरच्या लोकांशी संपर्कही बंद केला. अशा अवस्थेत माहेरच्या लोकांना, तुम्ही दिसलात की माझा अधिक छळ होतो म्हणून येणे जाणे टाळा.. असे शुभांगी सांगायची. माहेरच्या लग्न मयत अशा कोणत्याही कार्यक्रमाला दिले जाऊ दिले जात नव्हते
गुरुवारी रात्री शुभांगी घराबाहेर गेल्याची व ती बेपत्ता असल्याची मुरगूड पोलिसांना नवरा व सासर्याने तक्रार दिली. बेपत्ता असल्याची माहिती शुभांगीच्या माहेरी म्हणजे माळुंगे गावी समजल्यानंतर सर्वांनी शोध सुरू केला पण शुभांगी मिळून आली नाही.
अखेर आज शनिवारी गावाजवळच्या विहिरीत तिचे प्रेत मिळून आले. मुरगूड पोलिसांनी प्रेताचा पंचनामा करून मुरगुड सहकारी दवाखान्यात उत्तरीय तपासणीसाठी नेले यावेळी चिमगाव येथे आणि सरकारी दवाखान्याच्या दारात नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली होती.
शुभांगीचा अतोनात छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल नवरा विश्वास लोंढे,सासरा धोंडीराम विष्णू लोंढे, सासू शांताबाई लोंढे यांच्याविरुद्ध शुभांगी चे भाऊ संग्राम प्रकाश पाटील आणि अनिल मारुती पाटील यांनी मुरगूड पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सुसाईड नोट
आपण मानसिक आजारास कंटाळून आत्महत्या करीत असून कोणालाही दोषी धरू नये, अशा अर्थाची नोट लिहून तिने आत्महत्या केली असल्याची सासरच्या लोकांचे म्हणणे आहे. पण नोट लिहिलेला हा कागद खूप जुना असून गेल्या कित्येक दिवसांपूर्वी लिहिलेला असावा, अशी शंका नातेवाईकांनी व्यक्त केली.
शुभांगी सुशिक्षित पदवीधर होती अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होती ती शांत स्वभावाची व मनमिळाऊ असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आपली बहीण अडाणी नव्हती सुशिक्षित समंजस होती 18 वर्षे सासरचा जात सहन करून पोटच्याच्या मुलासाठी ती सासरी नांदत होती गेल्या अनेक वर्षात तिला माहेरी पाठवले जात नव्हते. कोणत्याही कार्यक्रमाला तिला येऊ दिले जात नव्हते. इतकेच काय तर घरी कोणी मयत झाले तर मयतावर येऊ दिले जात नव्हते फक्त फोनवरच भेट व्हायची ती म्हणायची इकडे आलात तर माझा अधिक जात होतो.. असे तिचा भाऊ संग्राम प्रकाश पाटील यानी सिंहवाणीशी बोलताना सांगितले
पुढे ते म्हणाले,
गेल्या दोन वर्षांपूर्वी मुरगूड पोलिसात आम्ही तक्रार दिली होती पण सामंजस्याने नाते टिकावे म्हणून समेर घडवून आणला होता.