क्राईमताज्या घडामोडी

कोल्हापूरातील घटना : माणुसकीला काळिमा: महिलेला 2 महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवलं;

कोल्हापूरातील घटना : माणुसकीला काळिमा:

महिलेला 2 महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवलं;

सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर :
पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरी इथं एका महिलेला साखळ दंडाने बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला? याबाबत तुर्तास माहिती मिळालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांचे क्राइम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला साखळदंडातून मुक्त केलं आहे. सारिका साळी (वय 40) असं या महिलेचं नाव असून पोलिसांकूडन महिलेची सुटका करण्यात आली आहे. संबंधित महिला वेडसर असून रस्त्यावर फिरताना काहीही उचलून घेते आणि खाण्याचा प्रयत्न करते, म्हणून तिच्यासमवेत असे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत.
साखळदंडात बांधण्यात आलेली महिला तिच्या भाच्याकडे राहते, तिचा भाऊ आणि भावाची बायको म्हणजे भावजय असे एकत्र राहतात. मात्र, गेल्या दीड ते 2 महिन्यांपासून महिलेला येथे साखळदंडात बांधण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येत असून अटकही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी कुलूप खोलणाऱ्या व्यक्तीला बोलावून महिलेला सांखळदडांतून मुक्त केले आहे. या महिलेला का बांधून ठेवलं याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, त्यादृष्टीने पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. मात्र, पोलिसांनी महिलेची सुटका केल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले असून संबंधित महिलेची सुटका करुन आरोपींवर कारवाईची मागणी त्यांच्याकडून होत आहे.

महिलेची सुटका, गुन्हा दाखल होणार
कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात राहणाऱ्या 40 वर्षीय अपंग महिलेला साखळदंडात डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजारामपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हा सगळा प्रकार उघडकीस आणला. पोलिसांनी कुलपाची चावी बनवणाऱ्या व्यक्तीला बोलवून साखर दंडातून मुक्त केलं. दरम्यान, तिची तब्येत बरी नसल्याने तिला उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आला असून कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उपनेते संजय पवार यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलेच्या कुटुंबातील एका युवकाला मारण्याचा देखील प्रयत्न केल्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बंद होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button