भालेकरवाडी येथे नांगरट करत असताना पॉवर विडर खाली सापडून शेतकरी जागीच ठार : पत्नी गंभीर जखमी

भालेकरवाडी येथे नांगरट करत असताना पॉवर विडर खाली सापडून शेतकरी जागीच ठार :
पत्नी गंभीर जखमी
सिंहवाणी ब्युरो / पाटगाव :
भालेकरवाडी (ता. भुदरगड ) येथे शेतात नांगरट करत असताना रोटा वेटर (टॅक्टर )खाली सापडून शेतकरी जागीच ठार झाला.मारुती नारायण भालेकर (वय ४५) मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर पत्नी शोभा मारुती भालेकर (वय ४०)या रोटावेटर उचलण्याच्या प्रयत्नात रोटावेटरमध्ये दोन्ही पाय सापडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
घटनास्थळावरून माहिती अशी, मृत मारुती हे आपली पत्नी शोभा यांच्या सोबत शेतात भात लागणीसाठी नांगरट करण्यासाठी रोटावेटर घेऊन गेले होते. रोटावेटर बांधवरून उतरत असताना मारुती यांच्या पोटावरती पडला त्यावेळी चालू रोटावेटर चे नांगे त्यांच्या पोटात घुसले ही घटना जवळच असणाऱ्या पत्नी शोभा यांनी पाहिले. आपल्या पतीला वाचविण्यासाठी त्या रोटावेटर उचलण्याच्या प्रयत्न करताना त्यांच्या साडीचा पदर रोटावेटर च्या नांग्यामध्ये सापडला त्यामुळे त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली.यामध्ये मारुती यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. जखमी शोभा यांच्यावर गारगोटी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार आनले असता, पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले आहे,,आहेत त्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. मारुती यांच्या मागे वृद्ध आई दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.