क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिसांवर गोळी बार करणाऱ्या नामचीन गुंडाचा मोहोळ येथे एनकाउंटर मध्यरात्री साडे तीन वाजता करण्यात आला एनकाउंटर

पोलिसांवर गोळी बार करणाऱ्या
नामचीन गुंडाचा मोहोळ येथे एनकाउंटर

मध्यरात्री साडे तीन वाजता करण्यात आला एनकाउंटर

सिंहवाणी ब्युरो / महेश गायकवाड, सोलापूर
हडपसर येथील गुंडाचा मोहोळ येथे एनकाउंटर करण्यात आला आहे. मध्यरात्री साडे तीन वाजता हा एन काउंटर करण्यात आला असून मोहोळ व पुणे पोलिसांकडून हा एनकाउंटर करण्यात आला आहे.
शाहरुख उर्फ अँटी रहिम शेख राहडपसर याचा एनकाउंटर करण्यात आला आहे.

आरोपीने कडेवर लहान मुलगा घेऊन पोलिसांवर गोळीबार केला अन्… पोलिसांनी प्रत्युत्तरा दाखल केलेल्या गोळीबारात लहान मुलाला कसलीही इजा न होऊ देता पुण्यातील सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी सोलापुरात पद्धतशीरपणे संपवला आहे ,

पुण्याच्या हडपसर पोलिसांनी अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी सोलापुरात पथक पाठवले होते. सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी येथे पोहोचल्यावर संशयित आरोपीने स्वतःच्या पिस्तुलातून पोलिसांवर गोळीबार केला .

यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या प्रत्युत्तर गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
प्रस्तुत प्रतिनिधीस घटनास्थळावरून नातेवाईक व परिसरातील नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, राजू अहमद शेख (व्यवसाय – ट्रक ड्रायव्हर) हे लांबोटी येथील नरुटे वस्तीवर गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचा मावस भाऊ शाहरुख उर्फ अंटी रहीम शेख (रा. सय्यद नगर, हडपसर, पुणे) आठ दिवसांपूर्वी त्यांच्या घरी आला होता. तो अनेक वर्षांनी प्रथमच घरी आला होता. पोलिसांनी त्याचे एनकाउंटर केल्याची माहिती समोर आली आहे.

घरातील पाहुण्याविषयी अधिक चौकशी केल्यावर समजले की, तो नंबरप्लेटशिवाय स्कूटीवर आला होता. तो दररोज सकाळी लवकर घराबाहेर निघायचा व रात्री उशिरा परत यायचा. त्याच्या वागणुकीविषयी घरच्यांना अधिक माहिती नव्हती.

आरोपीच्या लपण्याची जागा कशी शोधली?

शाहरुख हा दिवसभर बाहेर फिरायचा. पोलिसांना तो अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा होता. परिसरातील एका तरुणाकडून त्याने स्वतःच्या पत्नीशी फोनवरून संवाद साधला, आणि तिथेच तो चुकला. पोलिसांचे लक्ष आधीपासूनच त्याच्या कुटुंबावर होते. पत्नीला आलेल्या कॉलची नोंद पोलिसांना मिळाली आणि लोकेशनच्या आधारे त्यांनी तपास सुरू केला. संबंधित तरुणाने पोलिसांना अचूक माहिती दिल्यावर, आरोपीने एका एटीएममधून चार-पाच वेळा पैसे काढल्याचेही निष्पन्न झाले. त्यामुळे तो याच परिसरात लपलेला असल्याची पोलिसांना खात्री पटली.

पहाटे ३.३० वाजता ऑपरेशन

पहाटे साडेतीनच्या सुमारास, पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयिताच्या लपण्याच्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपीने आतून पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला अटक करून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.


पोलिसांनी वाचवले लहान मूल

आरोपीविरुद्ध काळेवाडी पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तो पाहुणा म्हणून राहत असताना एका लहान मुलाला जवळ घेऊन झोपत होता. पोलिसांची चाहूल लागताच त्याने लहान मुलाला कडेवर घेतले आणि त्याच अवस्थेत पोलिसांवर गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी अतिशय कौशल्याने लहान मुलाला कुठलीही इजा न होता सुरक्षित ठेवत आरोपीवर कारवाई केली. या चकमकीत आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button