आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कामाला लागा: भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी कामाला लागा:
भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून मतदारांसमोर जायचे आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या जनकल्याण्याच्या कामाचा लेखाजोखा जनतेपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपली असेल त्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करा .असे आवाहन भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी केले .
गारगोटी तालुका भुदरगड येथील सन्मित्र हॉल येथे संपन्न झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते .अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील होते .
यावेळी बोलताना श्री जाधव पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ता स्थापनेला अकरा वर्ष पूर्ण झाली आहे या अकरा वर्षांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक जनकल्याणाची कामे पार पडली आहे ही कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे . यासाठी “सेवा सुशासन गरीब कल्याणाची 11 वर्ष ” हे अभियान राबवण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या घराघरापर्यंत पोहोचणे ही आपली जबाबदारी आहे भाजपचा बूथ प्रमुख ते प्रत्येक कार्यकर्ता ही जबाबदारी कटाक्षाने पार पडेल असे श्री जाधव म्हणाले .
यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे भुदरगड तालुक्यात ही आपण सक्षमपनाने काम करतो आहोत भविष्यकाळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आपल्याला सामोरे जायचे आहे या महायुतीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवण्याची आहे यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसायला हवी बुथ रचना करायला हवी .तरच आपण या निवडणुकीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचू शकतो .भारतीय जनता पार्टी म्हणून आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी काम करू .लोकसभा विधानसभा निवडणुका या नेत्यांच्या निवडणुका असतात आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुकी आहेत यासाठी आपण ताकतीने काम करायला हवे अशा ताकदवान कार्यकर्त्यांना पक्ष निश्चितच बळ देईल .
यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या बाबत तालुकाध्यक्ष संतोष पाटील व नामदेव चौगुले तसेच युवा मोर्चाचे सरचिटणीस शशिकांत पाटील यांनी तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदार संघाची भौगोलिक आणि राजकीय माहिती दिली .
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर,जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा डॉक्टर आनंद गुरव युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धीरज करलकर, विलास बेलेकर,वसंतराव प्रभावळे, प्रा राजेंद्र ठाकुर ,देवराज बारदेसकर,रवींद्र कामत,
भगवान शिंदे, सुनील तेली, विनोद जाधव,विनायक परुळेकर,रणजीत आडके,सचिन देसाई,अमोल पाटील,वीरकुमार पाटील,शशिकांत पाटील,मोहन सूर्यवंशी,नंदू शिंदे,राहुल चौगले,विठ्ठल चौगले,कुमार पाटील,बबनराव निकम,सचिन हाळवणकर,भाऊ कोगणूळकर,पांडुरंग वायदंडे,निवास देसाई,अमृत गुरव,विनायक शिंदे,पंडित पाटील,विनोद जाधव,सतीश गायकवाड,बाबुराव रामाणे,सुनील पाटील,राम पाटील,बाबुराव पिंगळे,रणधीर गुरव,किरण गुरव,नेताजी झाम्बरे,शिवाजी पाटील,महिला आघाडीच्या अध्यक्षा ऐश्वर्या पुजारी, सुजाता थडके ,सरिता यादव आदी उपस्थित होते .
प्रारंभी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
स्वागत व प्रास्ताविक रवींद्र कामत यांनी केले तर आभार बीएसएनएल चे सदस्य रणजीत आडके यांनी मानले .