उद्याची सुदृढ पिढी निर्माण करण्यासाठी प्राथमिक शाळा हा शिक्षणाचा मूळ पाया: पालकमंत्री प्रकाश आबिटकर

उद्याची सुदृढ पिढी निर्माण करण्यासाठी
प्राथमिक शाळा हा शिक्षणाचा मूळ पाया:
पालकमंत्री प्रकाश आबिटकर
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
प्राथमिक शाळा हा शिक्षणाचा मूळ पाया आहे हा पाया घट्ट झाला तरच उद्याची सुदृढ पिढी निर्माण होऊ शकते .यासाठी सरकारच्या वतीने जे जे काही चांगलं करावं लागेल ते करण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांनी केले .
प्राथमिक शाळेतील नवागतांचे स्वागत या उपक्रमांतर्गत विद्यामंदिर आकुर्डे तालुका भुदरगड या शाळेत पालकमंत्री आबिटकर यांनी पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ते बोलत होते अध्यक्ष स्थानी आकुर्डेचे सरपंच रवींद्र पारकर हे होते .तर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील व योजना विभागाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ .एकनाथ आंबोकर हे प्रमुख उपस्थित होते .
यावेळी बोलताना नामदार आबिटकर पुढे म्हणाले,महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मोफत दिला जातात व मातृभाषेतून गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाते या चिमुकल्यांचे स्वागत करण्याचे भाग्य मला मिळाले याचा मला मनस्वी आनंद होत आहे लोकप्रतिनिधी म्हणून सर्वच शाळांच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे .
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांना अनेक योजना देण्याचे ठरवले आहे प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत गणवेश सर्वांना मोफत पुस्तकेआणि चांगल्या भौतिक सुविधा अशा अनेक योजना देण्याची ठरवली आहे या माध्यमातून प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हा या मागचा हितू असून शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणारा तालुका म्हणून आपल्या तालुक्याची ख्याती आहे .भविष्यकाळात अशा शिक्षणाचा दर्जा टिकवणे आणि तो वाढवणे ही जबाबदारी शिक्षकांची असून इथले शिक्षक त्या पद्धतीने काम करतील असा माझा विश्वास आहे .
यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा या दर्जेदार शिक्षण देत असतात .या दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातूनच ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी घडत आले आहेत त्यामुळे पालकांनी आपली पाल्य जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच दाखल करणे आवश्यक आहे .
आकुर्डे गावातील प्राथमिक शाळेच्या पहिलीच्या वर्गात जी मुले दाखल होतील त्यांच्या पालकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी एक वर्षासाठी माफ करण्याची घोषणा यावेळी सरपंच रवींद्र पारकर यांनी केली .
यावेळी तालुका संघाचे माजी चेअरमन अशोकराव भांदिग्रे माजी सरपंच किसनराव पाटील श्री पी एस कांबळे ग्रामपंचायत सदस्यश्रीकांत कांबळे डी जी गुरव नितीन पवार भास्कर तेलंग नितेश पाटील शहाजी कुपटे लिंगराज स्वामी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पवार नितीन कुंभार सुवर्णा कांबळे भिकाजी शेनवीबी आर पाटील मुख्याध्यापक रवींद्र एकल यांचे सह ग्रामस्थ पालक विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत विद्यामंदिर आकुर्डी या शाळेच्या प्रांगणात पालकमंत्री प्रकाश अबिटकर व शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
प्रारंभी स्वागत उपसरपंच केएम कुपटे यांनी केले आभार शिक्षक तानाजी सनगर यांनी मानले तर सूत्रसंचालन राजेंद्र शिंदे यांनी केले .