सहकार भारती भुदरगड तालुक्याची कार्यकारिणी जाहीर : तालुकाध्यक्षपदी प्रा.आनंद चव्हाण

सहकार भारती भुदरगड तालुक्याची कार्यकारिणी जाहीर
तालुकाध्यक्षपदी प्रा.आनंद चव्हाण
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या सहकार भारतीची भुदरगड तालुका कार्यकारिणी जाहीर केली, भुदरगड तालुकाध्यक्षपदी प्रा. आनंद मारुती चव्हाण यांची निवड करण्यात आली.महिला प्रदेश अध्यक्षा सौ वैशालीताई आवाडे यांच्या हस्ते काल नियुक्तीपत्रे देण्यात आली.
गारगोटी येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना सौ वैशालीताई आवाडे यांनी सहकार चळवळीला योग्य दिशा देण्यासाठी आणि सहकारी संस्थेने कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्यासाठी सहकार भारती नेहमीच आग्रही असते, यासाठी सहकारी संस्थामधील अधिकारी पदाधिकारी यांना प्रशिक्षण देणे, परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करून सहकारी सस्थांना सबल करण्यासाठी सहकार भारती प्रयत्न करत आहे. यावेळी विभाग संघटन प्रमुख चंद्रकांत धुळप, महाराष्ट्र राज्य प्रदेश पतसंस्था प्रकोष्ट प्रमुख सागर चौगुले, विभाग सहसंघटन प्रमुख जवाहर छाबडा, जिल्हा सचिव संजय सातपुते, यांची भाषणे झाली, शेवटी आभार तालुका महिला प्रमुख सौ.अश्विनी हरळीकर यांनी आभार मानले.
भुदरगड तालुका कार्यकारिणी अशी/-तालुका उपाध्यक्ष-डी डी मांडे, तालुका संपर्क प्रमुख प्रविणसिंह सावंत,सह संपर्क प्रमुख अमरसिंह पाटील, महामंत्री विजय पंडित, संघटन प्रमुख मयूर पाटील, सह संघटन प्रमुख दिलीप कदम, महिला तालुका प्रमुख सौ. अश्विनी राहुल हरळीकर, महिला सह प्रमुख सौ मयुरी शशिकांत पाटील,सचिव उमेश देसाई, प्रशिक्षण प्रकोष्ट प्रमुख अरुण गायकवाड,प्रशिक्षण प्रकोष्ट सह प्रमुख कृष्णात केरबा शिंदे,ऑडिट प्रकोष्ट प्रमुख पी बी खुटाळे
फोटो ओळ -भुदरगड तालुका कार्यकारिणी समवेत सौ वैशालीताई आवाडे, जवाहर छाबडा, चंद्रकांत धुळप, संजय सातपुते, सागर चौगुले आदी