भुदरगड भूमी अभिलेख कार्यालयाची इमारत होणार जिल्ह्यात भारी प्रकाश आबिटकरांनी केला आणखी एक कोटी मंजूर

भुदरगड भूमी अभिलेख कार्यालयाची इमारत होणार जिल्ह्यात भारी
प्रकाश आबिटकरांनी केला आणखी एक कोटी मंजूर
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
गारगोटी येथे भूमी अभिलेख
कार्यालय इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या परिसरातील सुधारणा, विद्युतीकरण, फर्निचर, कुंपणासाठी शासनाच्या महसूल विभागाने आणखी १ कोटी ८४ लाख ७८ हजार रुपये मंजूर केले आहेत. यामुळे इमारतीचे बांधकाम, अंतर्गत आणि परिसरातील सेवा-सुविधा पूर्ण होण्याला गती येणार आहे. एकूण ३ कोटी ३० लाखांवर निधी आतापर्यंत मंजूर झाल्याने कोल्हापुरातील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखच्या इमारतीपेक्षा गारगोटीची इमारत भारी होणार आहे.
गारगोटीत स्वतःच्या मालकीची इमारत नसल्याने भूमी अभिलेख कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे.
यामुळे कार्यालयात येणाऱ्यांना अनेक गैरसोयींना सामना करावा लागत होता, म्हणून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी इमारतीसाठी दीड कोटीचा निधी मंजूर करून घेतला. शेवटच्या टप्प्यातील कामे आणि परिसरातील सुधारणा करण्यासाठी गुरुवारी पुन्हा १ कोटीवन निधीचा मंजूर झाला आहे. आवश्यक निधी मिळाल्याने उर्वरित कामालाही गती येणार आहे. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर मालमत्ता पत्रक आणि इतर मिळकतीसंबंधीच्या कामकाजासाठी येणाऱ्यांना कार्यालयात सुविधा चांगल्य मिळतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.