उपजिल्हा रुग्णालय गारगोटी यांच्या वतीने योगा दिन साजरा: आरोग्य मंत्री आबिटकर यांची उपस्थितीती,

उपजिल्हा रुग्णालय गारगोटी यांच्या वतीने योगा दिन साजरा:
आरोग्य मंत्री आबिटकर यांची उपस्थितीती,
सिंहवाणी ब्युरो / योगेश कोळी शेणगाव ,
जागतिक योगा दिन उत्साहात साजरा,,, २१जून आंतराराष्ट्रीय योग दिवस उपजिल्हा रुग्णालय गारगोटी यांच्या नियोजनाखाली अशोका हाॅल गारगोटी येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत, आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला, संयुक्त राष्ट्र महासभेने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला, योग हा जीवनाच्या सर्व पैलू मधील समतोल साधण्यासाठी करण्यात येणारा व्यायाम आहे, यावेळी योगा प्रशिक्षक दत्तात्रय शंकर करवळ,कोल्हापूर आरोग्य विभाग उपसंचालक डी डी माने ,कोल्हापूर शैल्य चिकित्सक देशमुख मॅडम, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे , कोल्हापूर जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष नाथाजी पाटील, गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाचे वर्ग एक चे अध्यक्ष पल्लवी तारळकर , वैद्यकीय अधिकारी मिलिंद कदम डॉक्टर कुलकर्णी मॅडम, डॉक्टर शेट्टी मॅडम,गारगोटी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते, कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे एनसीसीचे विद्यार्थी आणि श्री शाहू कुमार भवन गारगोटी चे विद्यार्थी व शिक्षक या योगा दिनानिमित्त उपस्थित होते,*
